लोणंद नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व, शिवसेनेला जिंकता आली नाही एकही जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 04:38 PM2022-01-19T16:38:47+5:302022-01-19T16:39:13+5:30

समान मते, अन् शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव

Nagar Panchayat Election Results 2022, NCP rule over Lonand Nagar Panchayat | लोणंद नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व, शिवसेनेला जिंकता आली नाही एकही जागा

लोणंद नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व, शिवसेनेला जिंकता आली नाही एकही जागा

googlenewsNext

लोणंद : लोणंद नगरपंचायत निवडणुकीत सताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १७ पैकी १० जागा मिळवत निर्विवाद बहुमत मिळविले असून आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. या निवडणुकीत काँग्रेसला ३ जागा, भाजपाला ३ जागा तर १ अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. तर, शिवसेनेला एकही जागा मिळाली नसून पून्हा एकदा लोणंदच्या नागरीकांनी शिवसेनेला नाकारले आहे.

या निवडणूकीत अपक्ष उमेदवार राजश्री शेळके या एकमेव उपक्ष उमेदवार म्हणून निवडून आल्या. निवडणुकीसाठी सतरा प्रभागासाठी दोन टप्यात मतदान झाले होते. एकुण १६,७४५ मतदारापैकी १२,३२८ म्हणजे ७३.६२% मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला होता.

आज बुधवार दि.19 रोजी लोणंद नगरपंचायत सभागृहात सकाळी 10 वाजता निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शिवाजी जगताप व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा प्रभारी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीस प्रारंभ झाला. दोन तासात मतमोजणी पूर्ण झाली. 

या निवडणुकीत माजी समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके – पाटील, खंडाळा तालुका कॉग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ॲड. सर्फराज बाळासाहेब बागवान, कॉग्रेसचे जिल्हा सरचिटणीस माजी नगरसेवक राजेंद्र डोईफोडे, अॅड. सुभाषराव घाडगे, कुसुम शिरतोडे, विश्वास शिरतोडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर माजी नगराध्यक्ष सचिन शेळके, यांनी काँग्रेसचे अॅड. सर्फराज बागवान यांना पराभूत करुन विजय मिळविला. 

कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी निकालानंतर लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल वायकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

समान मते, अन् शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव

प्रभाग क्रमांक ११ मधून शिवसेनेचे विश्वास शिरतोडे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भरत बोडरे यांना ३२७ समान मते पडल्याने चिठ्ठी काढण्यात येऊन राष्ट्रवादीचे भरत बोडरे विजयी म्हणून घोषित करण्यात आले. 

Web Title: Nagar Panchayat Election Results 2022, NCP rule over Lonand Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.