"माझं आणि सुनेत्रा पवारांचं दुःख सारखंच, तरीही त्या...", विदीप जाधवांच्या पत्नीचा कंठ आला दाटून; भेटीनंतर काय बोलल्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 19:01 IST2026-02-02T18:59:13+5:302026-02-02T19:01:44+5:30

विमान अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. त्यात पीएसओ विदीप जाधव यांचाही समावेश होता. विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भेट घेतली आणि त्यांच्या कुटुंबाला आधार दिला. 

"My grief and that of Sunetra Pawar are the same, yet they...", Videep Jadhav's wife choked up; What did she say after the meeting? | "माझं आणि सुनेत्रा पवारांचं दुःख सारखंच, तरीही त्या...", विदीप जाधवांच्या पत्नीचा कंठ आला दाटून; भेटीनंतर काय बोलल्या?

"माझं आणि सुनेत्रा पवारांचं दुःख सारखंच, तरीही त्या...", विदीप जाधवांच्या पत्नीचा कंठ आला दाटून; भेटीनंतर काय बोलल्या?

बारामतीत झालेल्या विमान अपघातात अजित पवारांना जीव गमवावा लागला. त्यांच्यासोबत असलेल्या पीएसओ विदीप जाधन यांचाही जागेवरच मृत्यू झाला. कुटुंबाचा आधार गेल्याने कोलमडलेल्या विदीप जाधवांच्या कुटुंबीयांची अजित पवारांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वतःचं दुःख बाजूला सारून भेट घेतली. जाधवांच्या पत्नीसह कुटुंबीयांचे सांत्वन करत आधार दिला. यावेळी विदीप जाधवांच्या पत्नी आणि कुटुंबीयांना भरून आले. भेटीनंतर जाधवांच्या पत्नी म्हणाल्या, "सुनेत्रा पवारांचे दुःख आणि माझे दुःख एकसारखे आहे, तरीही त्या उभ्या आहेत. त्यांनी माझ्यावर आणि घरावर हात ठेवला आहे, हे मी विसरू शकत नाही", असे बोलताना त्यांचा कंठ दाटून आला. 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची फलटण तालुक्यातील तरडगाव येथे जाऊन भेट घेतली. पत्नी आणि मुलाच्या डोक्यावरून हात फिरवत कोणत्याही अडचणीमध्ये मी तुमच्यासोबत आहे, असा धीर त्यांनी विदीप जाधवांच्या कुटुंबीयांना दिला.  

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीनंतर बोलताना विदीप जाधव यांच्या पत्नी म्हणाल्या की, "माझे पती शेवटपर्यंत दादांसोबत होते. त्यांनी दादांना कधीच अंतर दिले नाही. त्याचप्रमाणे वहिनीही माझ्याबरोबर आयुष्यभर राहणार आहेत. माझ्या मुलांकडे आणि संपूर्ण कुटुंबीयांकडे त्याचे काय लक्ष राहणार आहे. त्यांचे आणि आमचे नाते घरच्यासारखे आहे. "

विमान अपघातात मृत्यू झालेल्या विदीप जाधव यांचे वडील सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर बोलताना म्हणाले की, "माझ्यासाठी तर हा मोठा धक्का आहे. परमेश्वराच्या कृपेने सावरण्याचा प्रयत्न करतोय. मुलाच्या खूप अपेक्षा होत्या. तशा पूर्ण झाल्या नाहीत. तो अर्धवट सोडून गेला. तो एकुलता एक मुलगा होता. २६ जानेवारीला प्रत्यक्ष त्याच्याशी बोलणे झाले होते", असे ते म्हणाले. 

Web Title : दुख समान: बारामती विमान दुर्घटना के बाद सुनेत्रा पवार ने परिवार को सांत्वना दी

Web Summary : बारामती विमान दुर्घटना में अजित पवार के पीएसओ की मृत्यु के बाद, सुनेत्रा पवार ने शोकग्रस्त परिवार का दौरा किया। विदीप जाधव की पत्नी ने कृतज्ञता व्यक्त करते हुए कहा कि सुनेत्रा पवार साझा दुख के बावजूद मजबूत हैं, और परिवार को निरंतर समर्थन का आश्वासन दिया। उन्होंने उनके घनिष्ठ, पारिवारिक बंधन पर जोर दिया।

Web Title : Sorrow Alike: Sunetra Pawar consoles family after Baramati plane crash

Web Summary : Following the Baramati plane crash that killed Ajit Pawar's PSO, Sunetra Pawar visited the bereaved family. Vidip Jadhav's wife expressed gratitude, noting Sunetra Pawar's strength despite shared grief, assuring ongoing support for the family. She emphasized their close, familial bond.