खूनप्रकरणातील संशयिताचा कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 18:00 IST2020-02-29T17:59:11+5:302020-02-29T18:00:03+5:30
पंचवीस लाखांच्या खंडणीसाठी तेजस विजय जाधव (वय १७, रा. आष्टे, ता. सातारा) या युवकाचा खुनाच्या प्रकरणात अटकेत असलेल्या साहिल रुस्तूम शिकलगार ( रा. नागठाणे, ता. सातारा) याने गुरुवारी सायंकाळी पोलीस कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्याच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खूनप्रकरणातील संशयिताचा कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न
सातारा : पंचवीस लाखांच्या खंडणीसाठी तेजस विजय जाधव (वय १७, रा. आष्टे, ता. सातारा) या युवकाचा खुनाच्या प्रकरणात अटकेत असलेल्या साहिल रुस्तूम शिकलगार ( रा. नागठाणे, ता. सातारा) याने गुरुवारी सायंकाळी पोलीस कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्याच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आष्टे, ता. सातारा येथील तेजस जाधव या युवकाचा खंडणीसाठी अपहरण करुन खून करण्यात आला होता. या गुन्ह्यात साहिल शिकलगारसह अन्य तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्याच्या लॉकअपला या संशयितांना ठेवण्यात आले आहे.
गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास यातील साहिल शिकलगार याला चौकशीसाठी बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी लॉकअपचा दरवाजा उघडला होता. यावेळी त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी साहिलच्या जागेवरच पकडले. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.