शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीसमोर आव्हानांची मालिका; विस्तारापासून अनेक निर्णय होणार
2
आजचे राशीभविष्य : 08 जून 2024; धन व कीर्ती ह्यांची हानी होईल, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
3
‘नीट’ निकालाची सीबीआय चौकशी करा, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसह ‘आयएमए’ची देखील मागणी
4
तूर्तास राजीनामा नको; शपथविधीनंतर चर्चा करू, गृहमंत्री अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना सबुरीचा सल्ला
5
T20 World Cup 2024 : आयर्लंडला हरवून कॅनडानं रचला इतिहास; आता 'लक्ष्य' पाकिस्तान, दिला इशारा
6
विधानसभेला कोकणात सर्व जागा जिंकणार, खासदार सुनील तटकरे यांना विश्वास 
7
केजरीवालांच्या जामीन अर्जाला ईडीकडून विरोध, सबळ पुरावे हाती असल्याचा तपास यंत्रणेचा कोर्टात दावा
8
गो-फर्स्टची तारण जमीन विकून होणार, केवळ ५० टक्क्यांचीच वसुली
9
अस्खलित मराठी बोलणारा नेता झाला बिहारमधून खासदार!
10
‘मोठा भाऊ’वरून पटोलेंना पक्षश्रेष्ठींच्या कानपिचक्या; महाविकास आघाडीत संघर्ष वाढण्याआधीच काँग्रेस सावध
11
राज्यातील ११ खासदारांची हॅट्ट्रिक रोखली; १० जणांना दुसऱ्यांदा संधी नाकारली  
12
शिंदे, फडणवीस, पवार यांची नवी दिल्लीत पटेल यांच्या निवासस्थानी बैठक
13
एअर इंडिया - विस्ताराचे विलीनीकरण अखेर मार्गस्थ
14
राणे बंधूंचा गैरसमज दूर करणार : उदय सामंत
15
आघाडी सरकारमुळे संघाच्या अजेंड्याचे काय होणार? मित्रपक्षांतील ‘बाबू फॅक्टर’मुळे अडथळे येण्याची शक्यता
16
शेअर बाजार घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी 'त्या' दिवशी बक्कळ कमाई केली; पाहा...
17
मोदींसोबत वाजपेयींसारखा गेम करू शकतात चंद्राबाबू नायडू?; भाजपा उचलतंय सावध पाऊल
18
ईव्हीएम जिवंत आहे का? म्हणणाऱ्या मोदींना काँग्रेसचे प्रत्युत्तर; म्हणाले, "पुरावे घेऊन तुमच्याकडे..."
19
अजित पवारांनंतर प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा; ईडीने परत केली १८० कोटींची संपत्ती
20
शेअर मार्केटने मोडला 3 जूनचा रेकॉर्ड; सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाढ, Sensex 76000 पार...

Satara: पिंपोडे बुद्रुक येथे युवकाचा निर्घृण खून, पोलिसांकडून तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 5:44 PM

पिंपोडे बुद्रुक : पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) येथे ज्वारी काढण्यासाठी गेलेल्या युवकाचा डोक्यात व तोंडावर अज्ञाताकडून खलबत्याच्या ठोंब्याने घाव ...

पिंपोडे बुद्रुक : पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) येथे ज्वारी काढण्यासाठी गेलेल्या युवकाचा डोक्यात व तोंडावर अज्ञाताकडून खलबत्याच्या ठोंब्याने घाव घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली. शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. भगवान मच्छिंद्र सपकाळ (वय २४, रा. पिंपोडे बुद्रुक) असे मृत तरुणाचे नाव आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की पिंपोडे बुद्रुक गावाच्या उत्तरेला दोन किलोमीटर अंतरावर परगणा वस्ती आहे. वस्तीच्या अलीकडे नव्याने बांधलेल्या श्रीघुमाई देवी मंदिरापासून हाकेच्या अंतरावर मळा नावाच्या शिवारात भगवान सपकाळ कालपासून ज्वारीची काढणी करत होता. आज सकाळी नऊच्या सुमारास तो एकटाच ज्वारी काढण्यासाठी गेला होता. दरम्यान, दुपारी बारा वाजता त्याची आई जेवणाचा डबा घेऊन गेली. यावेळी तिने शेतात भगवानचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहिला.

आपल्या पोटच्या पोराला रक्ताच्या थारोळ्यात पाहताच आईने आक्रोश केला. त्यावेळी परिसरात काम करणारे लोक धावून आले. घटनेची माहिती मिळताच वाठारचे सहायक पोलिस निरीक्षक अशोकराव हुलगे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर साताऱ्याहून ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी श्वानाला शेतात पडलेल्या खलबत्त्याच्या ठोंब्याचा वास देऊन मारेकऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्वान परगणा वस्तीपर्यंत जाऊन घुटमळले. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक अशोकराव हुलगे अधिक तपास करत आहेत.

मजुरी करणाऱ्या कुटुंबावर आघातभगवान हा गरीब कुटुंबातील मुलगा होता. त्याचे वडील मच्छिंद्र आणि आई शेती व मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. भगवान व त्याचा लहान भाऊ अभिजित हा शेतीकामात त्यांना मदत करत. भगवानने गावातील खासगी दवाखान्यात मदतनीस म्हणून काम केले होते. या घटनेमुळे या माेलमजुरी करणाऱ्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. सायंकाळी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस