Crime News Satara: चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीचा खून, डोक्यात मारली लोखंडी पार; नागझरी येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 14:09 IST2022-05-23T14:06:34+5:302022-05-23T14:09:24+5:30
घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नेमकी घटना कशामुळे घडली याचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Crime News Satara: चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीचा खून, डोक्यात मारली लोखंडी पार; नागझरी येथील घटना
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथे मोलमजुरी करणाऱ्या पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात लोखंडी पार मारून खून केला. या घटनेने नागझरीसह परिसरात खळबळ उडाली आहे. वैशाली बाबू जाधव (वय-३५) असे मृत पत्नीचे नाव आहे. बाबू बापू जाधव (४२, मूळ रा. सातारा, सध्या रा. नागझरी, ता. कोरेगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, मूळचे सातारा येथील असलेला बाबू जाधव हा मोलमजुरीच्या कामासाठी काही महिन्यांपूर्वी पत्नी व पाच मुलांसह नागझरी येथे आला. गावात मिळेल ते काम करुन ते कुटुंब उदरनिर्वाह चालवत होते. आज, सोमवारी सकाळी सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास चारित्र्याच्या संशयावरुन बाबू जाधव याने पत्नी वैशाली हिला लोखंडी पहारीने मारहाण केली.
पहारीचा डोक्यात बसलेला जिव्हारी ठोक्यामुळे वैशाली हिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान बाबू याने स्वत:लाही मारहाण करून घेतल्याची चर्चा असून तोही जखमी झाला असल्याने त्याला उपचारासाठी सातारा शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच रहिमतपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. नेमकी घटना कशामुळे घडली याचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली आहे.