लोणंदमध्ये पाणीपुरवठा सभापतीच्या चालकाचा दगडाने ठेचून खून  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 11:54 IST2018-08-05T11:53:55+5:302018-08-05T11:54:23+5:30

लोणंद नगरपंचायतीतील पाणीपुरवठा सभापती किरण पवार यांच्या क्रेनवर चालकाचे काम करत असलेल्याचा युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला.

murder in Lonand | लोणंदमध्ये पाणीपुरवठा सभापतीच्या चालकाचा दगडाने ठेचून खून  

लोणंदमध्ये पाणीपुरवठा सभापतीच्या चालकाचा दगडाने ठेचून खून  

लोणंद (सातारा) : लोणंद नगरपंचायतीतील पाणीपुरवठा सभापती किरण पवार यांच्या क्रेनवर चालकाचे काम करत असलेल्याचा युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही खळबळनक घटना रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आली. चंद्रकांत अंकुश साळुंखे असे खून झालेल्या चालकाचे नाव आहे. 

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, चंद्रकांत साळुंखे (वय ३५, मूळ रा. कोराळे, ता. बारामती. हल्ली रा. लोणंद) हे लोणंद पालिकेतील पाणीपुरवठा सभापती किरण पवार यांच्या क्रेनवर चालक म्हणून सात वर्षांपासून काम करत आहेत. लोणंद-शिरवळ मार्गावरील शेळकेवस्ती हद्दीत पवार यांच्या क्रेनचे कार्यालय आहे. या कार्यालयातच चंद्रकांत साळुंखे शनिवारी रात्री झोपले होते. दरम्यान, रविवारी सकाळी एक कर्मचारी तेथे गेला असता कार्यालय उघडले असल्याचे दिसले. आत जाऊन पाहिले असता साळुंखे यांचा दगडाने ठेचून खून केल्याचे निदर्शनास आले. 

ही माहिती त्या कर्मचा-याने तातडीने किरण पवार यांना सांगितले. त्यानुसार पवार यांनी लोणंद पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाच पाहणी केली असून, साताºयाहून श्वान पथकाला पाचारण केले आहे. परंतु श्वान इमारत परिसरातच घुटमळले.

Web Title: murder in Lonand