शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

पालिका इमारतीमुळे वाढली वाईची शान

By admin | Updated: November 9, 2015 23:29 IST

आज सोहळा : शरद पवार यांच्या हस्ते मकरंद पाटील यांचा नागरी सत्कार; जिल्ह्यातील राष्ट्रवादी आमदार राहणार उपस्थित

वाई : ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा असणाऱ्या वाई शहराच्या नावलौकिकात भर टाकणारी व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने साकारलेली संपूर्ण राज्याला आदर्शवत ठरणाऱ्या वाई नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मंगळवारी होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य अन् प्रशस्त इमारतीचा मान वाई नगरपालिकेने पटकाविला आहे.वाई-खंडाळा-महाबळेश्वर या भिन्न भौगोलिक परिस्थितीच्या मतदारसंघातील आमदार मकरंद पाटील यांच्या नागरी सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते होत आहे. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित राहणार आहेत.वाई शहराच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. भविष्याचा वेध घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाने साकारलेली सुसज्ज व एकाच छताखाली सर्व सुविधानियुक्त अशा इमारतीची मोठी आवश्यकता व गरज होती. नवीन प्रशासकीय इमारतीला २००९ मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. त्यानंतर आमदार मकरंद पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून सुमारे सात कोटींची भव्य इमारत उभी राहिली आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर नगरपालिकेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांची कार्यालये व नागरिकांसाठी असणारे सर्व कर भरणाकेंद्र, पाणीपुरवठा विभाग, नागरी सुविधा विभाग, आरोग्य विभाग आहेत. दुसऱ्या मजल्यावर सर्व विभागाच्या सभापतींसाठी स्वतंत्र कक्ष आहेत.बांधकाम विभाग, नगररचना विभाग, आस्थापना विभाग, विरोधी नेता कक्ष असे स्वतंत्र कक्ष करण्यात आले आहेत. लिफ्टची सोय आहे. तिसऱ्या मजल्यावर भव्य सभागृह, कॉन्फरन्स हॉल, गेस्ट रूम यात वेब कॅमेरा, सर्वत्र सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. पालिकेची अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित साकारलेली भव्य इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडत आहे. वाई पालिकेच्या इमारतीत सर्व विभागांसाठी स्वतंत्र कक्ष, सभापतींसाठी स्वतंत्र दालन तयार करण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना चांगली काम करण्याची ऊर्जा मिळणार आहे. त्यामुळे या कार्यालयाचे कधी उद्घाटन होईल, याकडे कर्मचारी त्याचप्रमाणे वाई शहरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी) वाई-खंडाळा- महाबळेश्वर या सर्वात मोठ्या व भिन्न भौगोलिक परिस्थितीच्या मतदारसंघाचे नेतृत्त्व करण्याची संधी मला येथील जनतेने सलग दोन वेळा दिली. यात वाईकर नागरिकांचा मोठा वाटा आहे. या इमारतीच्या पूर्णत्वासाठी मोठा निधी उपलब्ध करता आला व निवडणुकीत दिलेला शब्द पाळता आला, याबद्दल समाधानी आहे.- मकरंद पाटील, आमदार