Video: उदयनराजेंनी हटके स्टाईलने भरविला कार्यकर्त्याला पेढा; व्हिडिओची सोशल मीडियावर रंगलीय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 13:01 IST2022-08-17T13:01:13+5:302022-08-17T13:01:38+5:30
आपल्या हटके स्टाईलने उदयनराजेंनी आपला कार्यकर्ता विनोद मोरे याचा वाढदिवस साजरा केला.

Video: उदयनराजेंनी हटके स्टाईलने भरविला कार्यकर्त्याला पेढा; व्हिडिओची सोशल मीडियावर रंगलीय चर्चा
सातारा- खासदार उदयनराजे भोसले यांचे मित्रप्रेम सर्वश्रृत आहे. एखाद्यावर जीवापाड प्रेम करण्याची त्यांची ही पद्धत. त्यातच आणखी नगरपालिकांची निवडणूक येऊ घातलीय. त्यामुळे आपल्या हटके स्टाईलने उदयनराजेंनी आपला कार्यकर्ता विनोद मोरे याचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाचा केक तर कापलाच पण पेढाही भरविला तो आपल्या स्टाईलने...
खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या वेगळ्या स्टाईलसाठी कायम चर्चेत असतात. मग त्यांची गाड्यांची क्रेझ असो, गरीबांना मदत करण्याची किंवा आपल्या मित्रांसोबत वागण्याची. अनेकांच्या गळ्यात हात टाकून ते मनसोक्त गप्पा मारतात. मित्रांची घरी जाऊन हक्काने जेवण कर म्हणून सांगतात. अनेकजण त्यांना घरचा डबा जिथे असतील तिथे पोहच करतात.
सातारा- विनोद मोरे या कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या हटके स्टाईलने त्यांना पेढा भरविला. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. pic.twitter.com/YxVG9YFewi
— Lokmat (@lokmat) August 17, 2022
गोडोली येथील अशाच विनोद मोरे या कार्यकर्त्याचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. या वाढदिवसासाठी खास खासदार उदयनराजे भोसले यांनाच निमंत्रण होते. तेही मोठ्या उत्साहात वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. गोडोली येथे अशोक मोरे हे उदयनराजेंचे जुने कार्यकर्ते. त्यामुळे कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध. यामुळेच उदयनराजेंनीही विनोद मोरे यांचा वाढदिवस आठवणीतील वाढदिवस म्हणून साजरा केला.