...म्हणून उदयनराजे अजित पवारांच्या भेटीला गेले; अखेर 'नेमके' कारण आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 04:39 PM2022-02-05T16:39:42+5:302022-02-05T16:50:34+5:30

अजितदादा - उदयनराजे भेटीमुळे मात्र राजकीय वर्तुळात खळबळ

MP Udayan Raje Bhosale and Deputy Chief Minister Ajit Pawar met to discuss grants for various development works in Satara | ...म्हणून उदयनराजे अजित पवारांच्या भेटीला गेले; अखेर 'नेमके' कारण आले समोर

...म्हणून उदयनराजे अजित पवारांच्या भेटीला गेले; अखेर 'नेमके' कारण आले समोर

Next

सातारा : भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील विश्रामगृहात बैठक झाली.  या भेटीनंतर उदयनराजेंनी केलेल्या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. अन् त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. मात्र या भेटीचे कारण अखेर समोर आले आहे.

विकासकामांबाबत तसेच नगरपरिषदेच्या नवीन वाढीव हद्दीतील विकास कामांना प्राथमिक सोयी सुविधा अंतर्गत अनुदान मिळणेबाबत त्यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. तसेच प्रस्तावाद्वारे मागणी केली. अजितदादा - उदयनराजे भेटीमुळे मात्र राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

सातारा नगरपरिषद ही 'अ' वर्ग नगरपरिषद असून नुकतीच सातारा नगरपरिषदेची हद्दवाढ झालेली आहे. त्यामुळे २१.०४ चौ.कि.मी. इतके क्षेत्र वाढ होऊन एकुण २९.१९ चौ.कि.मी. इतके झाले आहे. हद्दवाढ झालेल्या क्षेत्राचे संपुर्ण सर्वेक्षण करण्यात आले असून या भागातील आवश्यक त्या रस्ते, गटारी, पथदिवे व ओपन स्पेस विकसीत करणे इ. प्राथमिक सोयी सुविधा पुरविण्यसाठी पहिल्या टप्प्यातील कामांची अंदाजपत्रके नगरपरिषदेने केली आहेत. त्याची एकुण किंमत रु.४,८५० लक्ष इतकी आहे.

सदरचा भाग हा मूळ हद्दीपेक्षा जवळपास तिप्पट एवढा असून त्या भागातील सुमारे ६०३७३ इतक्या लोकसंख्येस पायाभूत सुविधा पुरविणे आर्थिकदृष्ट्या नगरपरिषदेस शक्य नाही, त्यामुळे नव्याने हद्दीत आलेल्या भागामध्ये प्राथमिक सोयी सुविधा पुरविणेसाठी शासनाच्या विभागाकडुन अनुदान प्राप्त होते, त्या अंतर्गत सातारा नगरपरिषदेस रू.४,८५० लक्ष इतका निधी मंजुर करावा ही मागणी केली.

Web Title: MP Udayan Raje Bhosale and Deputy Chief Minister Ajit Pawar met to discuss grants for various development works in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.