शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
2
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
3
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
4
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
5
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
6
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
7
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
8
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
9
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
10
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
11
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
12
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
13
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
14
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
15
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
16
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
17
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
18
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
19
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
20
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
Daily Top 2Weekly Top 5

मोर्चा, घोषणांनी दणाणला सातारा

By admin | Updated: December 5, 2014 23:17 IST

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद : लाल बावट्यांनी गाजविला दिवस..!


जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद : लाल बावट्यांनी गाजविला दिवस..!
सातारा : राष्ट्रीयीकृत बँक कर्मचाऱ्यांचा संप, मोर्चा, सिटूची निदर्शने, अंगणवाडी सेविकांचा मोर्चा, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी असे दणाणून सोडणारे वातावरण आज शहरात होते. आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा, एक रुपयांचा कडीपत्ता सरकार झाले बेपत्ता आदी घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद परिसर कर्मचाऱ्यांनी दणाणून सोडला.

बेकायदेशीर इमारती, गाळा
बांधकामाची चौकशी करासातारा : खेड ग्रामपंचायत हद्दीतील बेकायदेशीर इमारती आणि गाळा बांधकामाची चौकशी करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे झाली आहे.
याबाबतचे निवेदन रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी दिले असून त्यामध्ये म्हटले आहे की, न्यू विकास नगर येथील अनिल कांबळे यांच्या शेजारी असणाऱ्या प्लॉट नंबर ९0 चे बांधकाम हे टीपी प्लान प्रमाणे झालेले नाही. त्यांच्यावर कारवाई करावी. कोयना सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांनी राखीव खुल्या भुखंडावर बांधकाम करून अनधिकृत गाळे काढले आहेत. येथील सभासदांवर गुन्हे दाखल करावेत. विसावा नाका येथील गुलमोहर प्लाझा या अनधिकृत अपार्टमेंटमध्ये तळघराची मान्यता असूनदेखील तेथे गाळे काढलेले आहेत. येथे सेटबॅक नसल्याने नागरिक, वाहनांना रहदारी करताना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे यामध्ये सहभागी असणारे आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती खेड सरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि खेड ग्रामपंचायतीला देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)


सातारा : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानूसार जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांमध्ये राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करा तसेच प्रत्येक नगरपालिकांमध्ये शहर फेरीवाला समिती कार्यान्वीत करून त्याची बैठक घेण्याची मागणी करत सर्वधर्मीय सुशिक्षीत बेरोजगार हॉकर्स संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालाच्या आदेशानुसार आणि शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकांमध्ये फेरीवाल्यांना न्याय मिळावा यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत बैठक घेतल्यानंतरही त्याची कार्यवाही झालेले नाही.
सर्व नगरपालिकांमध्ये राष्ट्रीय फेरीवाला समितीच्या निर्णयांची अंमलबजावणी करावी अशी मागणी करून फेरीवाल्यांनी म्हटले आहे की, सर्व नगरपालिका कार्यक्षेत्रात हॉकर्स झोन निश्चित करावा. अधिकारी आणि हॉकर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित सर्वेक्षण करून हॉकर्सना परवाने देण्यात यावेत. हॉकर्ससाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष लक्ष्मण निकम, शहराध्यक्ष संजय पवार, संघटक सुनील शिवदास, जिल्हा सरचिटणीस कॉ. शामराव चिंचणे, जावेद नायकवडी, युसूफ बागवान, सलीम शेख, सुनील बेलोशे, राजमहमंद पन्हाळकर, अशोक शिंदे, युवराज माने आदींच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)

हॉकर्सवर कारवाई करू नका...
राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची परिपूर्ण अंमलबजावणी होईपर्यंत जिल्ह्यातील कोणत्याही हॉकर्सवर नगरपालिका व शासनाच्या विभागाने कारवाई करू नये. बॉम्बे रेस्टॉरंट तसेच त्रिशंकू भागातील हॉकर्सना शासन निर्णय लागू करावेत, आदी मागण्याही या निवेदनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, हॉकर्सच्या मागण्यांचा विचार नाही झाला तर प्रजास्ांत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्याबरोबरच जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

फेरीवाला धोरणाची
अंमलबजावणी करा