'Moray's school' filled with irrigation and cattle feed for livestock | अजिंक्यताºयावर भरली ‘मोरांची शाळा’-पशुपक्ष्यांसाठी खाद्य-पाण्याची सोय
अजिंक्यताºयावर भरली ‘मोरांची शाळा’-पशुपक्ष्यांसाठी खाद्य-पाण्याची सोय

ठळक मुद्देललिता केसव यांचे मुक्या पक्ष्यांशी जुळले अतूट नाते

सातारा : अजिंक्यतारा किल्ला हा जैवविविधतेने नटला आहे. या किल्ल्यावर मोर, लांडोर, खारूताई, चिमण्या यासह अनेक पशुपक्ष्यांचा अधिवास आहे. या पक्ष्यांचा सांभाळ करणाºया ललिता केसव (मोरांची आई) पक्ष्यांसाठी दररोज खाद्य व पाण्याची व्यवस्था करीत आहेत. पशुपक्षीदेखील नित्यनेमाने या खाद्यावर ताव मारत आहेत. एकीकडे खाद्य व पाण्याविना पक्ष्यांची होरपळ सुरू झाली असताना अजिंक्यतारा किल्ल्यावरील हे चित्र मनाला गारवा देऊन जाते.

अजिंक्यताºयाच्या पायथ्याशी अनेक लहान-मोठ्या वसाहती आहेत. या वसाहतीत राहणाºया ललिता केसव गेल्या दहा वर्षांपासून किल्ल्यावरील मोर, लांडोर या पक्ष्यांचा सांभाळ करीत आहेत. भल्या पहाटे उठून पक्ष्यांना अन्नधान्य पुरविणे, स्वत:च्या हाताने तयार केलेल्या दगडी कुंडात पाण्याची व्यवस्था करणे, वृक्षारोपण, स्वच्छता हा त्यांचा दिनक्रम अविरतपणे सुरू आहे. ललिता केसव पोटच्या मुलांप्रमाणे मोरांचा सांभाळ करू लागल्या. त्यांना खाऊ-पिऊ घालू लागल्या. म्हणूनच त्यांना पंचक्रोशीत ‘मोरांची आई’ या नावाने ओळखले जाते.

सध्या उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नैसर्गिक जलस्त्रोत आटू लागल्याने पक्ष्यांचा खाद्य व पाण्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. त्यातच अजिंक्यतारा किल्ल्यावर वणवा लावण्याच्या घटनांत वाढ झाल्याने पक्ष्यांची होरपळ सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत ललिता केसव यांनी किल्ल्यावर खाद्य-पाण्याची व्यवस्था केल्याने पहाटे व सायंकाळी मोर, लांडोर, खारूताई, चिमणी यासह अनेक पक्षी या खाद्यावर ताव मारत असून, स्वच्छंदपणे वावरत आहेत. किल्ल्यावर फेरफटका मारणाºया नागरिकांना हे चित्र मनाला गारवा देऊन जात आहे.


Web Title: 'Moray's school' filled with irrigation and cattle feed for livestock
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.