पार्लरमध्ये घुसून केला तरुणीचा विनयभंग, गुन्हा दाखल; साताऱ्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 19:36 IST2022-03-28T19:36:15+5:302022-03-28T19:36:34+5:30
सातारा : पार्लरमध्ये घुसून एका तरुणीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी एका युवकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा ...

पार्लरमध्ये घुसून केला तरुणीचा विनयभंग, गुन्हा दाखल; साताऱ्यातील घटना
सातारा : पार्लरमध्ये घुसून एका तरुणीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी एका युवकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सचिन शिवराम माने (वय ३२, रा. शुक्रवार पेठ, सातारा), असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित तरुणीचा पार्लरचा व्यवसाय असून, त्या तरुणीशी वारंवार बोलण्याचा तो प्रयत्न करीत होता. दि. २६ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास माने हा पीडित युवतीच्या पार्लरमध्ये दारू पिऊन गेला. तरुणीला लाइटच्या बोर्डाजवळ धरून ‘तुला आता शाॅक देतो व तुला दाखवतोच,’ अशी धमकी देऊन मारहाण केली. पार्लरमधील ट्यूब फोडून स्टीमर तोडून नुकसान केले.
या प्रकारानंतर संबंधित पीडित तरुणीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. याबाबत हवालदार शिंदे अधिक तपास करीत आहेत.