आमदार जयकुमार गोरेंना पुन्हा पुण्याला हलविले, अपघातात पाय आणि छातीच्या बरगड्यांना झाली होती इजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 17:20 IST2023-01-07T17:19:03+5:302023-01-07T17:20:06+5:30
रुबी हॉल क्लिनिकमध्ये बारा दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. गुरुवारी त्यांना एअर ॲम्ब्युलन्सने बोराटवाडी येथील निवासस्थानी आणण्यात आले होते.

संग्रहीत फोटो
खटाव : गेल्या दोन दिवसात दगदग झाल्याने आमदार जयकुमार गोरे यांच्या छातीतील वेदना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जयकुमार गोरे यांना शुक्रवारी रात्री पुन्हा पुण्याला हलविण्यात आले.
फलटण येथे गेल्या १४ दिवसांपूर्वी भीषण अपघातात आमदार गोरे जखमी झाले होते. त्यांच्या पाय आणि छातीच्या बरगड्यांना इजा झाली होती. रुबी हॉल क्लिनिकमध्ये बारा दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. गुरुवारी त्यांना एअर ॲम्ब्युलन्सने बोराटवाडी येथील निवासस्थानी आणण्यात आले होते.
गुरुवारी आणि शुक्रवारी प्रवास तसेच खूप दगदग झाल्याने त्यांच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. रुबी हॉल क्लिनिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्थानिक डॉक्टरांनी आमदार गोरेंवर उपचार केले. त्यांना पुढील उपचारासाठी रात्री उशिरा पुण्याला हलविण्यात आले.
दोन दिवसात गोरे यांना पुरेशी विश्रांती मिळाली नाही. हालचाल वाढल्याने त्यांच्या छाती आणि पायाला वेदना होऊ लागल्या आहेत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काळजी करु नये असे आवाहन सोनिया गोरे यांनी केले आहे.