शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

कारागृह साताऱ्याबाहेर हलविण्यासाठी आमदार आक्रमक

By admin | Updated: July 15, 2015 00:20 IST

शिवेंद्रसिंहराजे : सर्व आमदार अधिवेशनात आवाज उठविणार

सागर गुजर - सातारा -शहरात असणारे कारागृह शहराबाहेर नेण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्व आमदार आक्रमकपणे पावसाळी अधिवेशनात मागणी करणार आहेत. पुनर्वसनांच्या प्रश्नाबाबतही तातडीने निर्णय व्हावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे, अशी माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.सातारा शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या जिल्हा कारागृहाच्या आजूबाजूच्या परिसरात बांधकाम करण्यावर बंधने घातली गेली आहे. ५00 मीटरच्या आत बांधकाम करणे कठीण होऊन बसले आहे. आजूबाजूची घरे पडायला झाली तरी बांधकाम करता येत नसल्याने नागरिकांमध्ये मोठा रोष आहे. परिसरातील नागरिकांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे गाऱ्हाणे मांडल्यानंतर त्यांनी हा संपूर्ण प्रश्न समजावून घेतला. तसेच नागरिकांच्या हितासाठी विधीमंडळात हा विषय लावून धरण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांवर होत असलेल्या या अन्यायाबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाठपुरावा करण्याचे ठरविले आहे. राष्ट्रवादीचे सर्व आमदारही याबाबत आक्रमक झाले आहेत. कारागृहामध्ये गंभीर गुन्हे केलेले कैदी असतात. काही वर्षांपूर्वी कारागृहाच्या भींतीवरुन उडी मारुन कैदी पसार झाला होता. साहजिकच या कैद्यांपासून आजूबाजूच्या वस्तीला धोका पोहोचू शकतो, त्यामुळे हे कारागृह शहराबाहेर नेणेच योग्य ठरणार आहे. बांधकामांवर बंधने न घालता हे कारागृह शहराबाहेर न्यावे, अशी आमदारांची मागणी आहे. काही दिवसांत हद्दवाढीचा प्रश्नही मार्गी लागण्याची शक्यता असल्याने सोईस्कर जागा पाहून हे कारागृह बाहेर नेण्यात यावे, अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातील महू-हातगेघर, उरमोडी येथील पुनर्वसनाचा प्रश्नही गंभीर असून तो तातडीने सोडवून पुनर्वसितांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे प्रश्न मांडणार आहे, असेही शिवेंद्रसिंहराजेंनी स्पष्ट केले. मेडिकल कॉलेज झालेच पाहिजेसाताऱ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय राष्ट्रवादी व काँगे्रस यांच्या आघाडी सरकारच्या काळात मंजूर झाले होते. मात्र, त्याबाबत अद्यापही अनिश्चितता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रश्नाचे नेमके काय झाले?, याचा जाबही विचारला जाणार आहे.मुंबईतील आॅर्थर रोड जेल लोकवस्तीत असतानाही त्याच्याभोवतीने मोठी बांधकामे झाली आहे, मग साताऱ्यात का होऊ शकत नाही. हाच मुद्दा आम्ही उपस्थित करणार आहोत.- शिवेंद्रसिंहराजे भोसलेआमदार