अल्पवयीन वर्षीय मुलीवर अत्याचार, सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 17:22 IST2018-02-06T17:19:35+5:302018-02-06T17:22:41+5:30
सातारा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन वर्षीय मुलीवर राहत्या घरात २०१४ पासून नोव्हेंबर २०१७ अखेरपर्यंत वारंवार जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी रमेश (पूर्ण नाव माहित नाही) रा. कोरेगाव याच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन वर्षीय मुलीवर अत्याचार, सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
सातारा : सातारा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन वर्षीय मुलीवर राहत्या घरात २०१४ पासून नोव्हेंबर २०१७ अखेरपर्यंत वारंवार जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी रमेश (पूर्ण नाव माहित नाही) रा. कोरेगाव याच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रमेश हा वडिलांसोबत २०१४ रोजी घरी आला. त्यानंतर एकेदिवशी दुपारी आई-वडील मजुरीसाठी बाहेर गेल्यानंतर रमेशने घरी आला. तुझे नाव काय, कितवीला आहे, असे म्हणत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला.
अशाप्रकारे वारंवार तिच्यावर अत्याचार करत राहिला.
याबाबत कोणाला काही सांगितले तर तुझ्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. संबंधित पीडित मुलगी आठ महिन्यांची गरोदर आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक दुधाने करत आहेत.