साताऱ्यात गळफास घेऊन अल्पवयीन मुलीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 15:51 IST2019-09-09T15:45:51+5:302019-09-09T15:51:06+5:30

सातारा : येथील दुर्गा पेठेमध्ये राहणाऱ्या रिसिता हृदयनाथ गायकवाड (वय १६) या अल्पवयीन मुलीने सोमवारी दुपारी बारा वाजता राहत्या घरात ...

Minor girl suicide after being strangled in Satara | साताऱ्यात गळफास घेऊन अल्पवयीन मुलीची आत्महत्या

साताऱ्यात गळफास घेऊन अल्पवयीन मुलीची आत्महत्या

ठळक मुद्देसाताऱ्यात गळफास घेऊन अल्पवयीन मुलीची आत्महत्यागेल्या काही दिवसांपासून तणावाखाली

सातारा : येथील दुर्गा पेठेमध्ये राहणाऱ्या रिसिता हृदयनाथ गायकवाड (वय १६) या अल्पवयीन मुलीने सोमवारी दुपारी बारा वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

रिसिता ही साताऱ्यातील एका शाळेमध्ये दहावी इयत्तेत शिकत होती. गेल्या काही दिवसांपासून ती तणावाखाली होती. सोमवारी दुपारी अचानक तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

हा प्रकार घरातल्यांच्या निदर्शनास आल्यानंतर घरातल्यांनी तिला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वी तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. रिसिताने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली? हे अद्याप समोर आले नाही. पोलीस तिच्या आई-वडिलांकडे आणि नातेवाइकांकडे याबाबत चौकशी करत आहेत.

Web Title: Minor girl suicide after being strangled in Satara