गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर २ युवकांकडून पाळत; चित्रीकरण करण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 19:36 IST2021-06-14T19:34:42+5:302021-06-14T19:36:20+5:30
Shambhuraj Desai : पोलिसांनी या घटनेनंतर त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर २ युवकांकडून पाळत; चित्रीकरण करण्याचा प्रयत्न
सातारा : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे रविवारी सायंकाळी घरातून बाहेर पडून शहरात पायी फेरफटका मारत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी त्यांचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. संबंधितांना अंगरक्षकांनी हटकल्यानंतर त्यांनी पळ काढला. मात्र पुन्हा तेच युवक तेथे आले आणि पुन्हा दुचाकीवरून वेगात निघून गेले.
या सर्व घटनेनंतर सातारा पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला असून, मंत्री सुरक्षित असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी सांगितले. दरम्यान, मंत्री देसाई यांच्या बंगल्याबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सातारा : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा संशयास्पद व्हिडीओ करणाऱ्या युवकांचा शोध पोलिसांकडून सुरू, त्याबाबत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्याशी सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजबाबत माहिती घेण्यात आली. pic.twitter.com/oacSArR2v8
— Lokmat (@MiLOKMAT) June 14, 2021
पोलिसांनी या घटनेनंतर त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्यावरून प्राथमिक तपासाचा भाग म्हणून युवकांचा शोध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती काही लागले नाही. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण नाकारल्यानंतर त्यांच्या बंगल्याबाहेर शेण्या जाळण्यात आल्या होत्या. यामुळे पोलीस त्या दृष्टीनेही तपास करत आहेत.
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात शिवसेनेकडून मराठी कंत्राटदाराला काम न करण्याची धमकी; मनसेचा आक्रमक पवित्राhttps://t.co/HRKjr50aXA
— Lokmat (@MiLOKMAT) June 14, 2021