मटकाकिंग समीर कच्छीवर जबरी चोरीचा गुन्हा--मायलेकराला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 20:48 IST2019-09-23T20:47:04+5:302019-09-23T20:48:42+5:30
गुप्ते यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी ३० हजार रुपये समीर कच्छीकडून घेतले होते. दरम्यान, काही दिवसानंतर राजेंद्र गुप्ते यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मटकाकिंग समीर कच्छीवर जबरी चोरीचा गुन्हा--मायलेकराला मारहाण
सातारा : पोलिसांच्या अटकेत असलेला मटकाकिंग समीर कच्छी याचा पाय आणखीनच खोलात रुतत असून, त्याच्यावर जबरीचा चोरीचाही गुन्हा सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. मायलेकराला मारहाण करून त्यांच्याजवळील तीन हजारांची रोकड त्याने चोरून नेल्याचे समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, लता राजेंद्र गुप्ते (रा. दिव्यनगरी, शाहूपुरी सातारा) यांचे पती राजेंद्र गुप्ते हे समीर कच्छीकडे हिशोबाचे काम पाहत होते. त्यावेळी त्यांचा अपघात झाला. या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. गुप्ते यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी ३० हजार रुपये समीर कच्छीकडून घेतले होते. दरम्यान, काही दिवसानंतर राजेंद्र गुप्ते यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. समीर कच्छीकडून आणलेले पैसे फेडण्यासाठी गुप्ते यांच्या मुलाने कच्छीजवळ काही दिवस काम करून पैसे फेडले. असे असताना दि. १६ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास लता गुप्ते आणि त्यांचा मुलगा दुचाकीवरून घरी जात असताना समीर कच्छी व त्याच्यासोबत असलेल्या अन्य युवकांनी त्यांना अडवले. मुलाला मारहाण करत त्याच्या खिशातील तीन हजारांची रोकड जबरदस्तीने हिसकावून घेतली. लता यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण करण्यात आली.