शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुक ‘मंगळा’च्या कक्षेत!

By admin | Updated: September 25, 2014 00:23 IST

पितृपक्ष संपला : मुहूर्ताची शोधाशोध सुरू; गुरुवार-शुक्रवारवर डोळा

राजीव मुळ्ये - सातारा  ‘इस्रो’चे यान आणि इच्छुक उमेदवार एकाच वेळी ‘मंगळा’च्या कक्षेत पोहोचले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगल मुहूर्ताची शोधाशोध सुरू झाली असून, येत्या गुरुवार-शुक्रवारचा मुहूर्त अनेकांकडून पकडला जाईल, अशी शक्यता आहे. पक्ष असो वा अपक्ष, पितृपक्ष संपल्याने प्रतिपक्षाला आपल्या शक्तीच्या कक्षा दाखवण्यास सगळेच दक्ष झाले आहेत.महायुती आणि आघाडीतील वरिष्ठ पातळीवरची रस्सीखेच पितृपक्षाबरोबरच संपुष्टात येऊन तडजोडीचे ‘घट’ नवरात्रारंभी बसविले जातील, अशी अटकळ अनेकांनी बांधली होती. युती अभंग राहिली; पण महायुती तुटली. त्यामुळे जिल्ह्यात शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्षाकडून इच्छुक असलेले उमेदवार रिंगणात असणारच, असे चित्र आहे. आता भाजप आणि शिवसेना यांंच्यात जिल्ह्यातील जागांची विभागणी कशी होते, यावर बंडखोरांची संख्या ठरणार आहे. परंतु उमेदवारांची संख्या सर्वच मतदारसंघांत वाढणार हे आता स्पष्ट झाले आहे. पितृपक्ष सुरू असतानाच अनेक इच्छुकांनी अर्ज भरण्यासाठीचा मुहूर्त जाणकारांना विचारण्यास सुरुवात केली होती. ज्योतिषशास्त्रातील तज्ज्ञांंचे उंबरठे झिजवून अनेकांनी योग्य दिवस आणि वेळ शोधून आणली आहे. प्राप्त माहितीनुसार, येत्या गुरुवारी आणि शुक्रवारी (दि. २५ आणि २६) उत्तम मुहूर्त असल्याचे ज्योतिषांनी इच्छुकांना सांगितले आहे. शनिवारी (दि. २७) मात्र ‘वैध्रती’ योग असून, तो अशुभ असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगितले जाते. त्यामुळे शनिवारी अर्ज भरले जाणार नाहीत, असे अनेक इच्छुकांच्या गोटातून सांगितले गेले.ज्योतिषशास्त्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, विवाह, साखरपुडा अशा कौटुंबिक समारंभांबरोबरच अनेक चांगल्या कामांसाठी मुहूर्त पाहिला जातो. दक्षिणेतील राज्यांत तर अधिकारीही पदग्रहण करताना ‘राहूकाळ’ पाहतात म्हणे! पितृपक्षात उमेदवारी अर्ज भरण्याचे साहस सहसा कुणीच करत नाही. यावर्षी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तसे आव्हान देऊनही कुणी अर्ज दाखल केला नाही. तथापि, वरिष्ठ पातळीवरून आघाड्या-बिघाड्यांचा लंबक सतत हलत राहिल्यानेही पितृपक्षात अर्ज दाखल करणे कुणाला शक्य झाले नाही. त्यामुळे उरल्यासुरल्या अवधीत मुहूर्त पाळणे कुणाकुणाला जमणार आणि कोण-कोण मुहूर्त न पाहता अर्ज दाखल करणार, हेही पाहावे लागणार आहे.भारताचे यान मंगळाच्या कक्षेत पोहोचले असतानाच अर्ज भरण्यासाठी मुहूर्त शोधणारे नेते फुले, शाहू, आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा सांगतात. या चौघांनीही शुभ-अशुभाच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार केला. उमेदवारही त्यांचे विचार आणि कामाच्या जोरावरच विजयी होणार आहेत. त्यामुळे त्यांनी शुभ-अशुभांच्या चौकटी भेदाव्यात, अशी त्यांना आमची कळकळीची विनंती आहे.- डॉ. हमीद दाभोलकर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती