पैशांसाठी विवाहितेचा जाचहाट, पाच जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 15:30 IST2022-04-06T15:29:48+5:302022-04-06T15:30:08+5:30

सातारा: माहेरहून पैसे आणावेत, यासाठी विवाहितेचा जाचहाट केल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात पाचजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पंकज अरुण ...

Marriage trial for money, crime against five in Satara | पैशांसाठी विवाहितेचा जाचहाट, पाच जणांवर गुन्हा

पैशांसाठी विवाहितेचा जाचहाट, पाच जणांवर गुन्हा

सातारा: माहेरहून पैसे आणावेत, यासाठी विवाहितेचा जाचहाट केल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात पाचजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पंकज अरुण पाटील, सासू स्नेहल अरुण पाटील, सासरे अरुण काशीनाथ पाटील, नणंद माधवी महेंद्र पाटील, नणंद भक्ती अरविंद पाटील (सर्व रा. आंबेपूरख पेझारी ता. अलिबाग, जि. रायगड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विवाहिता पल्लवी पंकज पाटील (वय ३७ सध्या रा. करंजे तर्फे सातारा) हिच्याकडे पती पंकज पाटील हा वारंवार पैशाची मागणी करत होता. पैलवीच्या आईने पैसे देण्यास नकार दिल्याने तिला मारहाण केली. तसेच इतर संशयितांनीही मारहाण करून मानसिक व शारीरिक त्रास दिला असल्याचे पल्लवीने तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Marriage trial for money, crime against five in Satara