शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

बाजारातील कोहळ्याला लागली एसटी संपाची नजर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:02 PM

सातारा : घराला नजर लागू नये, यासाठी घरात कोहळा बांधण्याची प्रथा ग्रामीण भागामध्ये रूढ आहे. सुती कापडात गुंडाळून तुळवीला बांधलेला कोहळा वर्षातून दिवाळी सणाच्या निमित्ताने बदलला जातो. यंदा एसटीच्या संपामुळे ग्रामीण ग्राहक न आल्याने भाजी मंडईत कोहळ्याला उठाव नाही मिळाला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ७० टक्के माल शिल्लक राहिला आहे. त्यामुळे ...

सातारा : घराला नजर लागू नये, यासाठी घरात कोहळा बांधण्याची प्रथा ग्रामीण भागामध्ये रूढ आहे. सुती कापडात गुंडाळून तुळवीला बांधलेला कोहळा वर्षातून दिवाळी सणाच्या निमित्ताने बदलला जातो. यंदा एसटीच्या संपामुळे ग्रामीण ग्राहक न आल्याने भाजी मंडईत कोहळ्याला उठाव नाही मिळाला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ७० टक्के माल शिल्लक राहिला आहे. त्यामुळे कोहळ्याला एसटी संपाची नजर लागल्याचे विक्रेते कुजबुजत आहेत.साताºयात कोहळ्याला वर्षभर मागणी असते. मात्र, वर्षाचा मोठा सण म्हणून घराची स्वच्छता केल्यानंतर ग्रामीण भागात कोहळा बांधण्याची पद्धत जुनी आहे. त्यामुळे वर्षाच्या सणाच्या खरेदीबरोबरच ग्रामीण भागातील लोक मंडईतून कोहळा घेऊन जातात.यंदा मात्र एसटीच्या संपामुळे ग्रामस्थांची भलतीच कोंडी झाली. गावाकडून शहरात यायला वाहन नसल्यामुळे रोजच्या रोज दुचाकीवरून येणाºयांकडून त्यांनी दिवाळीचे साहित्य मागविले. यात कोहळ्याची खरेदी राहिली. एसटीचा संप मिटला असला तरी शेतात कामे सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांचे कोहळे खरेदी लांबणीवर पडली आहे. त्यामुळे मंडईत कडाडलेल्या भाज्यांची जागा कोहळ्यांनी घेतली आहे.पन्नास रुपयांपासून दीडशे रुपयांपर्यंत किंमतग्रामीण भागात तुळवीला कोहळं बांधण्याची पद्धत आहे. त्यामुळे हे फळ अत्यंत पवित्र मानले जाते. घरात येणाºया संकटाची पहिली चाहूल कोहळ्याला लागते आणि तो खराब होतो. त्यावरून संकटाची व्याप्ती लक्षात येते.अशी ग्रामीण भागातील लोकांची धारणा आहे. त्यामुळे सणाच्या निमित्ताने कोहळ्याला मागणी वाढते. आकारानुसार पन्नास रुपयांपासून दीडशे रुपयांपर्यंत कोहळे मिळते.

टॅग्स :agricultureशेती