शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

लोकसहभागातून बहुले गाव, शिवारात पाणीदार क्रांती : बारामाही पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:06 AM

जलयुक्त शिवार योजनेत सहभागी नसतानाही पाटण तालुक्यातील बहुले गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी एकजुटीतून मातीचे अठरा बंधारे बांधले. त्यामुळे गावातील संपूर्ण विहिरी बारमाही तुडुंब पाण्याने

ठळक मुद्देओढ्यावर बांधले अठरा बंधारे; दीडशे एकर क्षेत्र पाण्याखाली आणण्यासाठी धडपड

सुनील साळुंखे।मल्हारपेठ : जलयुक्त शिवार योजनेत सहभागी नसतानाही पाटण तालुक्यातील बहुले गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी एकजुटीतून मातीचे अठरा बंधारे बांधले. त्यामुळे गावातील संपूर्ण विहिरी बारमाही तुडुंब पाण्याने भरून राहिल्या आहेत. वर्षभर ओढ्याला पाणी राहिल्याने गावासह शिवारात पाणीदार क्रांती झाली आहे.

मारुल हवेली भागातील बहुले गावातील शेतकऱ्यांनी लोकसहभागातून गेल्यावर्षी शिवारातील लहान-मोठे ओढ्यांचे वाया जाणारे पाणी अडवून ठिकठिकाणी मातीचे अठरा वळण बंधारे बांधले व ओढ्याचे पाणी अडविले. गेल्यावर्षी बंधाºयाचे काम केल्यामुळे येणाºया हिवाळ्यात व उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवणार नाही. बहुले गावातील शेतकºयांना गांधीटेकडी पाणी योजनेमुळे बहुले-गारवडे ओढ्याला राहणाºया पाण्याचा फायदा होत होता. मात्र गेल्या सात-आठ वर्षांपासून उन्हाळ्यात टंचाईस सामोरे जावे लागत होते.

यावर काहीतरी उपाययोजना करण्यासाठी शेतकरी राजू पाटील यांनी गावातील सहकारी सयाजी पवार, सर्जेराव पानस्कर, रामचंद्र पानस्कर, भरत पानस्कर, अंकुश पानस्कर, राजन पवार, शंकर पवार, दाजी पवार, पांडुरंग डवरी, मानसिंग पानस्कर, भीमराव जरे, भरत पवार यांनी शिवारातून पावसाळ्यात वाया जाणारे पाणी ठिकठिकाणी बंधारे बांधून अडविले आणि गावात पाणीसाठा केला. लोकसहभागातून मातीचे बंधारे बांधून पाणी अडवा, पाणी जिरवा या मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी केली.पंधरा-वीस वर्षांपूर्वी पाऊसकाळ जास्त असल्यामुळे बहुले-गारवडे ओढ्याला ऐन उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी होते. त्यामुळे बहुले गावात विहिरींची संख्या अनेक वर्षांपासून जास्त आहे.आसपासच्या गावांनाही झाला फायदापाणी अडवा, पाणी जिरवा या पाणीदार मोहिमेचे महत्त्व ग्रामस्थांना पटल्याने ग्रामस्थांचा सहभाग वाढला आहे. यामुळे बहुले गावातील सुमारे पाचशे एकर शेती क्षेत्र ओलिताखाली आले आहे. बाजूला असणारे उर्वरित १५० एकर क्षेत्र पाण्याखाली आणण्यासाठी धडपड चालू आहे. बहुले परिसरातील गारवडे, पाळेकरवाडी गावातील विहिरींनाही या बंधाºयाचा फायदा झाला असून, पाणीसाठा वाढला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwater shortageपाणीटंचाई