लोकसहभागातून बहुले गाव, शिवारात पाणीदार क्रांती : बारामाही पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 00:06 IST2018-12-21T00:06:19+5:302018-12-21T00:06:56+5:30
जलयुक्त शिवार योजनेत सहभागी नसतानाही पाटण तालुक्यातील बहुले गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी एकजुटीतून मातीचे अठरा बंधारे बांधले. त्यामुळे गावातील संपूर्ण विहिरी बारमाही तुडुंब पाण्याने

लोकसहभागातून बहुले गाव, शिवारात पाणीदार क्रांती : बारामाही पाणीसाठा
सुनील साळुंखे।
मल्हारपेठ : जलयुक्त शिवार योजनेत सहभागी नसतानाही पाटण तालुक्यातील बहुले गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी एकजुटीतून मातीचे अठरा बंधारे बांधले. त्यामुळे गावातील संपूर्ण विहिरी बारमाही तुडुंब पाण्याने भरून राहिल्या आहेत. वर्षभर ओढ्याला पाणी राहिल्याने गावासह शिवारात पाणीदार क्रांती झाली आहे.
मारुल हवेली भागातील बहुले गावातील शेतकऱ्यांनी लोकसहभागातून गेल्यावर्षी शिवारातील लहान-मोठे ओढ्यांचे वाया जाणारे पाणी अडवून ठिकठिकाणी मातीचे अठरा वळण बंधारे बांधले व ओढ्याचे पाणी अडविले. गेल्यावर्षी बंधाºयाचे काम केल्यामुळे येणाºया हिवाळ्यात व उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवणार नाही. बहुले गावातील शेतकºयांना गांधीटेकडी पाणी योजनेमुळे बहुले-गारवडे ओढ्याला राहणाºया पाण्याचा फायदा होत होता. मात्र गेल्या सात-आठ वर्षांपासून उन्हाळ्यात टंचाईस सामोरे जावे लागत होते.
यावर काहीतरी उपाययोजना करण्यासाठी शेतकरी राजू पाटील यांनी गावातील सहकारी सयाजी पवार, सर्जेराव पानस्कर, रामचंद्र पानस्कर, भरत पानस्कर, अंकुश पानस्कर, राजन पवार, शंकर पवार, दाजी पवार, पांडुरंग डवरी, मानसिंग पानस्कर, भीमराव जरे, भरत पवार यांनी शिवारातून पावसाळ्यात वाया जाणारे पाणी ठिकठिकाणी बंधारे बांधून अडविले आणि गावात पाणीसाठा केला. लोकसहभागातून मातीचे बंधारे बांधून पाणी अडवा, पाणी जिरवा या मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी केली.
पंधरा-वीस वर्षांपूर्वी पाऊसकाळ जास्त असल्यामुळे बहुले-गारवडे ओढ्याला ऐन उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी होते. त्यामुळे बहुले गावात विहिरींची संख्या अनेक वर्षांपासून जास्त आहे.
आसपासच्या गावांनाही झाला फायदा
पाणी अडवा, पाणी जिरवा या पाणीदार मोहिमेचे महत्त्व ग्रामस्थांना पटल्याने ग्रामस्थांचा सहभाग वाढला आहे. यामुळे बहुले गावातील सुमारे पाचशे एकर शेती क्षेत्र ओलिताखाली आले आहे. बाजूला असणारे उर्वरित १५० एकर क्षेत्र पाण्याखाली आणण्यासाठी धडपड चालू आहे. बहुले परिसरातील गारवडे, पाळेकरवाडी गावातील विहिरींनाही या बंधाºयाचा फायदा झाला असून, पाणीसाठा वाढला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.