अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून लग्नाचा बनाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 13:46 IST2018-09-18T13:45:07+5:302018-09-18T13:46:42+5:30

शहरालगत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्याबरोबर लग्न केल्याचे भासवल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Make a wedding by torturing a minor girl | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून लग्नाचा बनाव

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून लग्नाचा बनाव

ठळक मुद्दे सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलकडी लावून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार

सातारा : शहरालगत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्याबरोबर लग्न केल्याचे भासवल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, १७ वर्षीय मुलगी घरात एकटी असताना गणेश सुभाष जाधव (वय २२, रा. सैदापूर, ता. सातारा) याने प्रवेश केला. आतून दाराची कडी लावून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर गणेशचे वडील सुभाष जाधव, अंबिका सुभाष जाधव (दोघे रा. सैदापूर), शालन दीपक पवार, सुनील दीपक पवार (दोघे रा. करंजे) यांनी १० जुलै रोजी कोंडवे येथील शंकराच्या मंदिरात लग्न केल्याचे भासवले. 

दुसºया दिवशी परत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. तसेच काही दिवसांनी चारित्र्याच्या संशयाने शिवीगाळ व मारहाण केली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक गिते करीत आहेत.
 

Web Title: Make a wedding by torturing a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.