शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Satara: मलकापुरात महामार्गावर दिवसभर वाहतुकीचा कोंडमारा!, वाहनधारकांमधून संताप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 14:02 IST

सुमारे दीड ते दोन तास वाहतूक कोंडी, कोल्हापूर नाक्यावर रस्ता अरुंद त्यातच यात्रांच्या वाहनांची भरती

मलकापूर : महामार्गाच्या कोल्हापूर-सातारा लेनवर कोल्हापूर नाका परिसरात रस्ता अरूंद त्यातच वाहनांची गर्दी होत असल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या नागरिकांना सुमारे दीड ते दोन तास वाहतूक कोंडीत अडकावे लागले. त्यामुळे मलकापुरात महामार्गावर वाहतुकीचा कोंडमारा होऊन सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला.पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर मलकापूर हद्दीत नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते. मलकापुरात सध्या महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. या सहापदरीकरणाच्या कामामुळे अचानक बदल करून काही ठिकाणी कोल्हापूर-सातारा लेनवरील वाहतूक उपमार्गावरून वळविण्यात आलेली आहे. खड्डेयुक्त मार्गातून मार्ग काढताना महामार्गावरील वाहतूक संथगतीने सुरू असते.

कोल्हापूर नाका ते कोयना नदी पुलापर्यंत भराव पुलाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे या ठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे. याच परिसरात बस व प्रवासी वाहतूक करणारी खासगी वाहने उभी राहतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यातच विविध गावांच्या यात्रा सुरू झाल्यामुळे यात्रेसाठी बाहेर पडलेल्या वाहनांची महामार्गावर गर्दी होत आहे. या कोंडीमुळे दहा मिनिटांच्या अंतराला सुमारे तास लागत होता. रविवार असल्यामुळे मुंबई-पुणेकडे जाणारी वाहने वाढल्याने या लेनवर वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीचा मलकापूरकरांना मात्र प्रचंड त्रास सहन करावा लागला. ही नेहमीचीच वाहतूक कोंडी स्थानिक नागरिकांची डोकेदुखी बनत आहे. ठिकठिकाणी दिवसभर वाहतूक पोलिसांनी मदत करावी, अशी मागणी वाहनधारक करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Traffic Jams Plague Malkapur Highway, Angering Drivers

Web Summary : Malkapur's highway faces daily gridlock due to road work and increased vehicles. Kolhapur Naka witnesses severe congestion, causing hours-long delays for commuters traveling towards Mumbai and Pune. This disrupts local life, demanding police assistance.