शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

बनगरवाडीतील मुख्य रस्ताच बनलाय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:38 IST

वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील बनगरवाडी गावातील मुख्य रस्त्यावरच असंख्य मोठमोठे खड्डे पडून, रस्ता पूर्णपणे वाहतुकीस धोकादायक बनला आहे. खड्डेमय ...

वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील बनगरवाडी गावातील मुख्य रस्त्यावरच असंख्य मोठमोठे खड्डे पडून, रस्ता पूर्णपणे वाहतुकीस धोकादायक बनला आहे. खड्डेमय रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, येथील ग्रामस्थांना दळणवळण करण्यासाठी हा महत्त्वाचा रस्ता असून, वरकुटे-मलवडी ते म्हसवड या मुख्य रस्त्याला जोडणारा एकमेव मार्ग आहे. यामुळे या रस्त्यावर अधिक प्रमाणात वाहनांची ये-जा असल्याने, तो वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.

बनगरवाडी गावच्या पश्चिमेला अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले जांभुळणी हद्दीतील डोंगरावरील भोजलिंग देवस्थान आहे. बनगरवाडीतून येणारा थेट रस्ता डोंगरपायथ्याशी जोडला असल्याने प्रत्येक रविवार, पौर्णिमा, अमावास्येला येणाऱ्या हजारो भाविकांना या खड्डेमय रस्त्याने जाताना कमालीची कसरत करावी लागत आहे. ग्रामपंचायत कार्यालय ते महादेव मंदिर हा दोन किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्यासंबंधी गावकऱ्यांनी अनेकदा संबंधित विभागाला सूचना केल्या आहेत. वेळोवेळी कागदपत्रांचा पाठपुरावाही केला आहे. तरीही हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबितच राहिला आहे. अनेकदा या रस्त्यावर छोट्या-मोठ्या दुर्घटना घडलेल्या आहेत. दुर्दैवाने एखादी मोठी अपघाती घटना घडल्यास जबाबदार कोण? दुर्घटना घडल्यानंतरच संबंधित विभागाचे डोळे उघडणार का? याबाबत ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. तरी सोयीस्कर प्रवासाच्या दृष्टिकोनातून ताबडतोब उपयोजना करून हा प्रश्न मार्गी लावून रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे, अशी मागणी नागरिक, भाविक-भक्त आणि प्रवाशांकडून केली जात आहे.

(कोट )

माण तालुक्यातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या सर्वच नेत्यांनी हा रस्ता करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, निवडणूक झाल्यापासून अद्यापपर्यंत एकही नेता बनगरवाडी गावाकडे फिरकलेला नाही.

- विक्रम शिंगाडे, सामाजिक कार्यकर्ते, बनगरवाडी

25वरकुटे मलवडी

बनगरवाडी गावातील मुख्य रस्त्यावरच असंख्य मोठमोठे खड्डे पडून, रस्ता पूर्णपणे वाहतुकीस धोकादायक बनला आहे. (छाया : सिद्धार्थ सरतापे)