शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
7
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
8
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
9
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
10
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
11
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
12
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
13
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
14
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
15
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
16
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
17
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
18
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
19
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
20
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

Satara: महायुतीत अजून तिढा; आघाडीला कोडं सुटेना! 

By नितीन काळेल | Published: March 30, 2024 7:25 PM

रणजितसिंह मोहिते फडणवीसांना भेटले; उत्तम जानकर यांची भूमिका काय?

सातारा : माढा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार जाहीर होऊनही नाराजीमुळे तिढा कायम आहे. तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून अनेकजण इच्छुक असलेतरीही उमेदवारी कोणाला द्यावी, याचे कोडे सुटलेले नाही. त्यामुळे माढ्याच्या रणांगणात युतीबाबततरी नाराजीनाट्य, विरोध आणि गाठीभेटी एेवढाच सिलसीला सुरू असल्याचे दिसत आहे.

माढा मतदारसंघाची आताची चाैथी निवडणूक ही इतर तीनपेक्षा वेगळी ठरलेली आहे. यापूर्वी निवडणुका झाल्या. पण, उमेदवारीवरुन आतासारखे कधीच गहजब झाले नाही. आताची निवडणूक महायुतीसाठी वेगळी ठरत आहे. तसेच महाविकास आघाडीसाठीही विचाराची झाली आहे. महायुतीतील भाजपने खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिली. पण, युतीतीलच रामराजे नाईक-निंबाळकर आणि मोहिते-पाटील यांचा विरोध अजुन तसूभरही कमी झालेला नाही. त्यामुळे खासदारांना टेन्शनमध्ये राहण्याची वेळ आली आहे.रामराजेंसह राष्ट्रवादीच्या सातारा जिल्ह्यातील गटाने तर माढ्याचा उमेदवार बदलाच असाच घोषा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लावलेला आहे. यासाठी रामराजेंनी पुन्हा अजित पवार यांचीही भेट घेतली. पण, चर्चेशिवाय पुढे काहीच झालेले नाही. तर भाजपचे धैर्यशील मोहिते-पाटील निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. त्यांची नाराजी आणि विरोधही मावळलेला नाही. फक्त ते संधीच्या शोधात आहेत. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाशी हातमिळवणी करुनही ते तुतारी वाजवू शकतात. पण, अजूनही त्यांना हिरवा कंदील दाखविण्यात आलेला नाही. तरीही धैर्यशील मोहिते यांच्या मतदारसंघात गाठीभेटी सुरूच आहेत. तर भाजपचे नेते मोहिते-पाटील यांच्याशी चर्चा करत आहेत. पण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: यामध्ये लक्ष घालत नाहीत, तोपर्यंत हा तिढा कायमच राहणार आहे.महाविकास आघाडीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा मतदारसंघात अजून पूर्णपणे लक्ष घातलेच नाही. राष्ट्रवादीचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे, शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी युतीतील नाराज मोहिते-पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. पण, त्यातून पुढे काहीच झाले नाही. तरीही ही भेट घडविण्यामागे शरद पवार हेच असल्याची माहितीही समोर येत आहे. त्यातच शरद पवार यांनीही माढ्यासाठी योग्य उमेदवाराचा शोध सुरू असल्याचे सांगितल्याने राजकीय खेळी करण्याचेच संकेत दिले आहेत. त्यामुळे आघाडीचा उमदेवार हा महायुतीतील तिढा सुटत नाही तोपर्यंत जाहीर होणार नाही, असेच चित्र दिसत आहे.

रणजितसिंह मोहिते फडणवीसांना भेटले; उत्तम जानकर यांची भूमिका ठरणार !माढ्यात महायुतीत अजून वाद कायम असून या पार्श्वभूमीवर भाजप आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. तर मोहिते यांचे माळशिरस तालुक्यातील उत्तम जानकर हे कट्टर विरोधक आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच मोहिते यांच्याशी जमवून घेण्याचे संकेत दिले होते.मात्र, खासदार रणजितसिंह आणि आमदार जयकुमार गोरे यांनी मुंबईत फडणवीस यांच्याशी जानकर यांची भेट घडवली. जानकर यांना भेटीत खासदारांचे काम करण्याबाबत सांगण्यात आले. पण, जानकर यांनी आठ दिवसानंतर समऱ्थकांचा मेळावा घेऊन कळवतो, असे म्हटल्याची माहिती मिळत आहे. तरीही युतीतील हा गाठीभेटीचा सिलसीला कायमच असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlok sabhaलोकसभाPoliticsराजकारणmadha-acमाढाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा