शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला, आता दरवाजा फोडायचा'; शिवेंद्रराजेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 21:42 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीची आज कराड येथे सभा झाली. या सभेत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून आज कराड येथे महायुतीची सभा पार पाडली. या सभेतून आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. "पूर्वी हा सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. आता या बालेकिल्ल्याचे सगळे बुरुज ढासळले आहेत, असा टोला शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला. 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?

यावेळी सभेत बोलताना शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, "पूर्वी हा सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. आता या बालेकिल्ल्याची अवस्था अशी झाली की, सगळे बुरुज ढासळले आहेत. तटबंदी जी आहे ती नेस्तनाबुत झाली आहे. आता मनोजदादांना निवडूण देऊन समोरचा दरवाजा फोडायचा आहे. बाकी सगळा बालेकिल्ला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घेरला आहे. आता बाकी दरवाजा फोडण्याच काम कराड उत्तरच्या जनतेने करावा, असा निशाणा शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला.

 खासदार छत्रपती उदयनराजे संतापले

 देवेंद्र फडणवीस आज इतकं काम करतायेत, जो माणूस काम करतो त्याला आज धमक्या मिळतायेत. जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. माणसांनी काम करायचं नाही का?, मग अशा व्यक्तीच्या मागे, पक्षामागे, युतीमागे आपण उभं राहणार नसेल तर कुणाच्या मागे उभं राहायचं हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:च्या मनाला विचारला पाहिजे असं खासदार उदयनराजे यांनी म्हटलं. 

कराडच्या जाहीर सभेत उदयनराजे म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्र पहिल्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा. मात्र इथल्या लोकांना केवळ झुलवत ठेवलं गेले. पश्चिम महाराष्ट्रातील लोकांचे प्रश्न होते, ते सोडवले नाहीत. राजकारणात सगळ्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी फक्त आश्वासने दिली. आश्वासन देताना आपण जेव्हा लोकांसमोर जातो, आशीर्वाद देत आमदार, खासदार बनवतात. मात्र लोकांचं ऋण कधी फेडले गेले नाही. त्यामुळे फार याकडे लक्ष देऊ नका. वर नरेंद्र आणि खाली देवेंद्र अशी म्हण आहे. आधीच्या काळात योजना पूर्ण झाल्या असत्या तर तेव्हाचे तरूण जे आज त्यांचे वय झाले त्यांचे आयुष्य व्यर्थ गेले नसते. लोकांची जास्तीत जास्त प्रगती झाली पाहिजे यादृष्टीने आम्ही कार्यरत असणार आहे असं त्यांनी सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४satara-acसाताराShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसले