शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

Maharashtra Bandh : कऱ्हाडात मराठा समाजबांधवांचे सामूहिक मुंडण, तासवडे टोलनाक्यावर भजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 2:08 PM

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी गुरुवारी सकाळी मराठा समाजबांधवांनी सामूहिक मुंडण आंदोलन केले. यावेळी एक मराठा, लाख मराठा असा जयघोष करीत मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, अशी मागणी केली.

ठळक मुद्देकऱ्हाडात मराठा समाजबांधवांचे सामूहिक मुंडण, तासवडे टोलनाक्यावर भजन कृष्णा नदीकाठी घुमला एक मराठा.. लाख मराठाचा जयघोष

कऱ्हाड (सातारा) : महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी गुरुवारी सकाळी मराठा समाजबांधवांनी सामूहिक मुंडण आंदोलन केले. यावेळी एक मराठा, लाख मराठा असा जयघोष करीत मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, अशी मागणी केली.दरम्यान, आशियाई महामार्ग ४७ वर उंब्रज येथील तासवडे टोलनाक्यावर काही मराठा समाजबांधवांनी टाळ-मृदंगाच्या गजरात भजन करीत रास्तारोको केला.कऱ्हाड तालुक्यातील मराठा माता-भगिनींकडून १ आॅगस्टपासून सुरू करण्यात आलेले ठिय्या आंदोलन गुरुवारी तात्पुरते स्थगित करण्यात आले. बंदवेळी शांतता पाळण्याचे आवाहनही करण्यात आले.कऱ्हाड शहरातील नागरिक तसेच कृष्णा-कोयना नदीच्या प्रीतिसंगमावर दररोज पोहण्यासाठी येणाऱ्या मराठा समाजबांधवांनी एक मराठा, लाख मराठा असा जयघोष करीत समाजाच्या आरक्षण मागणीसाठी मुंडण करून शासनाचा निषेध नोंदविला.ओगलेवाडी, वडगाव हवेली येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी कऱ्हाड -तासगाव रोडवर वडगाव हवेली येथे मराठा समाजबांधवांनी तासभर रास्तारोको आंदोलन केले.तासवडे टोलनाक्यावर रास्तारोको अन् भजनमराठा समाजबांधवांच्या वतीने गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आशियाई महामार्ग ४७ वरील तासवडे टोलनाक्यावर रास्तारोको केला. यावेळी काही समाजबांधवांनी सोबत टाळ आणि मृदंगही आणले होते. त्यांनी महामार्गावर ठिय्या मांडत भजनही केले.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदSatara areaसातारा परिसर