शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात शशिकांत शिंदे; अतुल भोसले यांच्यासह २० उमेदवारी अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 17:00 IST

सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखलच्या तिसऱ्या दिवशी १७ उमेदवारांनी २० नामनिर्देशनपत्रे दाखल केली. यामध्ये कोरेगाव मतदारसंघातून आमदार ...

सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखलच्या तिसऱ्या दिवशी १७ उमेदवारांनी २० नामनिर्देशनपत्रे दाखल केली. यामध्ये कोरेगाव मतदारसंघातून आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि कऱ्हाड दक्षिणमधून भाजपकडून डाॅ. अतुल भोसले यांनी अर्ज दाखल केला आहे. तर पाटण, कऱ्हाड उत्तर, फलटण आणि वाई मतदारसंघासाठी गुरुवारी कोणीही अर्ज दाखल केलेला नाही.विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. पहिल्या दोन दिवसांत अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या कमी होती. पण, गुरुवारी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले. विधानसभेच्या आठ मतदारसंघासाठी १७ उमेदवारांची २० नामनिर्देशनपत्रे दाखल झाली. माण मतदारसंघातून दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले. कऱ्हाड दक्षिणसाठी ६ उमेदवारांची ८ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली. तसेच सातारा विधानसभा निवडणुकीसाठी दोघांनी अर्ज दाखल केला आहे. कोरेगाव मतदारसंघासाठी ७ उमेदवारांची ८ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत.

माण विधानसभा मतदारसंघातून गुरुवारी संदीप जनार्दन खरात आणि शिवाजीराव शामराव मोरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. कऱ्हाड दक्षिणसाठी भाजपकडून डाॅ. अतुल भोसले आणि डाॅ. सुरेश भोसले यांनी उमेदवारी दाखल केली. तसेच याच मतदारसंघात अपक्ष म्हणून गोरख गणपती शिंदे, विश्वजीत अशोक पाटील, इंद्रजित अशोक गुजर, रवींद्र वसंतराव यादव यांनी अर्ज भरला आहे.सातारा मतदारसंघासाठी वसंतराव मानकुमरे आणि राजेंद्र निवृत्ती कांबळे या दोघांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात जालिंदर शंकर गोडसे यांनी शिवसेना आणि अपक्ष म्हणून दोन अर्ज दाखल केले. तसेच आमदार शशिकांत शिंदे आणि त्यांची पत्नी वैशाली शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे. तसेच अपक्ष म्हणून उद्धव आत्माराम कर्णे, ॲड. संतोष गणपत कमाने, सचिन सुभाष महाजन, उमेश भाऊ चव्हाण यांनी अर्ज भरला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४satara-acसाताराShashikant Shindeशशिकांत शिंदेAtul Bhosaleअतुल भोसलेMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी