मनाली येथे महाबळेश्वर ट्रेकर्स, शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमच्या गाडीला अपघात; सहाजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 10:00 IST2022-06-06T09:59:55+5:302022-06-06T10:00:51+5:30
या अपघातात विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून चालक गंभीर जखमी झाला आहे.

मनाली येथे महाबळेश्वर ट्रेकर्स, शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमच्या गाडीला अपघात; सहाजण जखमी
सातारा: मनाली येथे प्रशिक्षणासाठी गेलेल्या महाबळेश्वर ट्रेकर्स आणि शिवेंद्रसिंहराजे रेस्कु टीमच्या जवानांच्या गाडीला सोमवारी पहाटे अपघात झाला. या अपघातात सहाजण जखमी झाले असून इतर सर्व ट्रेकर्स सुखरूप असल्याचे समजते.
याबाबत माहिती अशी की, महाबळेश्वर ट्रेकर्सचे सहा जवान आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले रेसक्यू टीमचे सहा जवान आणि इतर ठिकाणचे असे मिळून ५१ जण अभ्यास दौऱ्यासाठी हिमाचल प्रदेश येथे गेले होते. अभ्यास दौरा आटपून परत येत असताना मनाली येथे दोन खासगी बसचा समोरासमोर अपघात झाला. यामध्ये विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून चालक गंभीर जखमी झाला आहे.