शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

महाबळेश्वरमध्ये पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या, मुलासमोर थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 1:28 PM

पुण्याहून महाबळेश्वरला फिरायला आलेल्या पर्यटकाने पत्नीचा धारदार चाकूने गळ्यावर वार करून खून केला. त्यानंतर स्वत:वर देखील वार करून आत्महत्या केली. खळबळजनक ही घटना कोयना लॉजिंगमध्ये गुरुवारी पहाटे उघडकीस आली.

ठळक मुद्देमहाबळेश्वरमध्ये पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या, मुलासमोर थरार पुण्याहून फिरायला आलेल्या पर्यटकाचे कृत्य

महाबळेश्वर : पुण्याहून महाबळेश्वरला फिरायला आलेल्या पर्यटकाने पत्नीचा धारदार चाकूने गळ्यावर वार करून खून केला. त्यानंतर स्वत:वर देखील वार करून आत्महत्या केली. खळबळजनक ही घटना कोयना लॉजिंगमध्ये गुरुवारी पहाटे उघडकीस आली.अनिल सुभाष शिंदे (वय ३४, रा. वडार सोसायटी आॅफिसजवळ धानोरी रोड विश्रांतवाडी पुणे), तर पत्नी सीमा (३०) अशी त्यांची नावे आहेत.याबाबत माहिती अशी की, पुणे येथील अनिल शिंदे हे पत्नी सीमा, मुलगा आदित्य याच्यासह बुधवारी महाबळेश्वर येथे फिरायला आले. तिघेही सायंकाळी कोयना लॉजिंगमध्ये त्यांच्या खोलीत परतले. मध्यरात्री एकच्या सुमारास लॉजिंग मालकाला खोलीतून आवाज आल्याने त्याने रुमच्या दिशेने धाव घेतली.

खोली आतून बंद होती. तेव्हा आवाज दिला असता मुलगा आदित्यने खोली उघडली. त्यावेळी दोघांचेही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यांनी पोलीस तसेच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला याची माहिती दिली.

दोघानांही महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ठसेतज्ज्ञांना गुरुवारी सकाळी पाचारण करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.मुलगा घाबरलेलापत्नीचा खून करून आत्महत्या करण्याचा थरार मुलगा आदित्य याच्यासमोरच सुरू होता. लॉज मालकाने आवाज दिला असता त्याने दरवाजा उघडला. हा प्रकार पाहून तोही घाबरला आहे.

टॅग्स :MurderखूनMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानPuneपुणेSatara areaसातारा परिसर