शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

स्पर्धेनंतर माण तालुका सुना सुना! तुफान थांबलं : श्रमदान लोकांचे वेळापत्रक बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 20:51 IST

दहिवडी : ‘दुष्काळ’ हा शब्द पुसण्यासाठी गेली ४५ दिवस तालुक्याने ऊन, वारा अन् पावसाची तमा न बाळगता दिवसरात्र काम केले. पहाटे पाचला भोंगा.. लोकं अंघोळ चहा, नाष्टा.. घर, आंगण, जनावराचा गोठा साफ.. जनावरांच्या धारा व्हायच्या तोपर्यंत सातचा भोंगा व्हायचा.

दहिवडी : ‘दुष्काळ’ हा शब्द पुसण्यासाठी गेली ४५ दिवस तालुक्याने ऊन, वारा अन् पावसाची तमा न बाळगता दिवसरात्र काम केले. पहाटे पाचला भोंगा.. लोकं अंघोळ चहा, नाष्टा.. घर, आंगण, जनावराचा गोठा साफ.. जनावरांच्या धारा व्हायच्या तोपर्यंत सातचा भोंगा व्हायचा.

ज्या ठिकाणी काम असायचं तेथे पोहोचायची. लहान मुलांपासून आबालवृद्धापर्यंत सायकल, मोटारसायकल, ट्रॅक्टर बैलगाडीसह मिळेल त्या वाहनांनी, वेळप्रसंगी चालत जायची. अख्खं गाव कामावर तुटून पडायचं. आपली जिंदगी गेली मुलांचा तरी सरळ व्हावं म्हणून काळ्या मातीला हिरवा शालू नेसवण्यासाठी झटली. काहीकाळ या माण तालुक्यात खरोखरच तुफान आलं होतं.

आता ४५ दिवसांची स्पर्धा संपली शेवटच्या दिवशी लोक नाचले. गोड जेवणही केलं. लोकांच्या डोळ्यांत आसू आणि हसू पाहायला मिळाले, या कामामुळे अनेक दिवसांचं वैर संपलं होतं. जलसंधारणाबरोबर मनसंधारण झालं होतं.

स्पर्धा संपल्यानंतर दुसरा दिवस उजडला. नेहमीप्रमाणं वाजणारा भोंगा थांबला होता. रोजची धावपळ थांबली होती. रोजची लागलेली कामाची सवय त्यामुळे मन सुनं सुनं झालं. काम करण्याची मिळालेली ऊर्जा थांबू देत नव्हती. पावले शेताकडे वळत होती; पण काय करणार रोज चालणारी पावलं थबकली होती. कारण स्पर्धा संपली होती. लोकांचं वेळापत्रकच जणू कोलमडलं होतं. एक लढाई जिंकली होती. माणदेशी माणसांनी केलेले काम पाणी फाउंडेशनचे सीओ सत्यजित भटकळ यांनी पाहिल्यासून ते शेवटच्या दिवसापर्यंत माणच्या मातीत थांबून होते.

लोकांचा उत्साह सर्व पक्षांच्या लोकांनी दिलेली मदत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या मायभूमीला दिलेले योगदान यासह प्रांतधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सुरेखा माने, समन्वयक अजित पवार, डॉ. प्रदीप पोळ, प्रफुल्ल सुतारसह सर्व पाणी फाउंडेशनच्या टीमनं केलेल्या कामाचे विशेष कौतुक केले.

वॉटरकप स्पर्धेत भाग घेतला; पण ज्या गावाला मशिनरीच नव्हती, अशा गावाला भारतीय जैन संघटनेने २७ मे पर्यंत मशीन देण्याचा निर्णय घेतला असून, हे काम स्पर्धेत धरले जाणार नसून जी गावे स्पर्धेत उतरली नाहीत त्यांना आणखी संधी उपलब्ध करून दिल्याचे तालुकाध्यक्ष भरतेशशेठ गांधी यांनी सांगितले.

 

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाSatara areaसातारा परिसर