विनामास्क फिरणाऱ्यांवर लोणंद पोलिसांची दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:41 IST2021-03-27T04:41:18+5:302021-03-27T04:41:18+5:30

लोणंद : लोणंद पोलिसांनी शहरात विनामास्क फिरणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. लोणंद शहरात ...

Lonand police take punitive action against unmasked walkers | विनामास्क फिरणाऱ्यांवर लोणंद पोलिसांची दंडात्मक कारवाई

विनामास्क फिरणाऱ्यांवर लोणंद पोलिसांची दंडात्मक कारवाई

लोणंद : लोणंद पोलिसांनी शहरात विनामास्क फिरणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.

लोणंद शहरात वाढत चाललेल्या कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी लोणंद नगरपंचायत व पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विनामास्क फिरणाऱ्या दुचाकीस्वार तसेच व्यापारी पेठेतील व्यापारी व नागरिकांवर पोलिसांनी धडक कारवाई करून दंड वसूल करण्यात येत आहे.

या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस हवालदार श्रीनाथ कदम, संजय जाधव, शिवाजी सावंत, फय्याज शेख, संतोष नाळे, ज्ञानेश्वर मुळीक, लोणंद नगरपंचायत कर्मचारी नानासाहेब शेळके, वैभव शेळके, होमगार्ड आदींनी सहभाग घेतला. नागरिकांना विनामास्क बाहेर न पडण्याचे तसेच सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी केले आहे.

Web Title: Lonand police take punitive action against unmasked walkers