शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

Lok Sabha Election 2019 सातारा जिल्ह्यात घोंगावतंय भाऊबंदकीचं वादळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:29 PM

जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात भाऊबंदकीचं वादळ घोंगावताना पाहायला मिळत आहे. राजकीय पक्षांनी या भाऊबंदकीला खतपाणी घातले आहे. आता सख्खा भाऊ पक्का वैरी

ठळक मुद्देकबके बिछडे आज कहाँ आके मिलेकाहींवर आली सख्या भाऊ पक्का वैरी म्हणण्याची वेळी 

सागर गुजर । सातारा : जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात भाऊबंदकीचं वादळ घोंगावताना पाहायला मिळत आहे. राजकीय पक्षांनी या भाऊबंदकीला खतपाणी घातले आहे. आता सख्खा भाऊ पक्का वैरी म्हणण्याची वेळ काहींवर आली आहे, तर काही जणांचे कबके बिछडे..आज कहाँ आके मिले, असं म्हणत पुन्हा मनोमिलन झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असणाºया घराण्यात सातारा शहराची सत्ता वर्षानुवर्षे आहे. खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले घराण्याचा राजकीय वारसा पुढे नेत आहेत. दोन राजे व त्यांच्या कार्यकर्त्यांमधून विस्तवही जात नाही, अशी परिस्थिती वर्षानुवर्षे आहे. मधल्या काळात राजेंचे मनोमिलन झाले. दोघांच्या अध्यक्षतेखालील आघाड्यांनी सातारा पालिकेची सत्ता मिळवली. मात्र मनोमिलन तुटले आणि दोघांत दरार आली. दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठे वैमनस्य निर्माण झाले. शहरातील राजेंचे गट नेहमीच एकमेंकावर फुरफुरत राहिले. मात्र, ऐन निवडणुकीत साताºयात खासदार उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मनोमिलन झाले. मनोमिलनाच्या दुसºया अध्यायाचा श्रीगणेशा दोन्ही आघाड्यांच्या एकत्रित मेळाव्यात झाला. दोन्हीकडून एकमेकांना मदत करण्याच्या आणाभाका घेण्यात आल्या. वैर सोडून उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे एकत्रित कामाला लागले आहेत. 

उदयनराजे भोसले यांच्या विरोधात दंड थोपटलेले शिवसेना-भाजप युतीचे नरेंद्र पाटील हे राष्ट्रवादी, भाजप असा प्रवास करून शिवसेनेत दाखल झाले आहेत. शिवसेनेत प्रवेश अन् लगेच उमेदवारी...असे गणित त्यांनी साध्य केले. राष्ट्रवादीने त्यांना विधानपरिषदेचे आमदार केले होते. भाजपने त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद दिले. त्यांनी अत्यंत वेगाने पक्ष बदलले; मात्र त्यांचे धाकटे बंधू व सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश पाटील हे मात्र राष्ट्रवादीतच राहिले आहेत. आता सख्खा भाऊ जरी निवडणुकीला उभा राहिला असला तरी रमेश पाटील यांनी मात्र पक्षासोबत राहणे पसंद केले आहे. नरेंद्र पाटील यांनी जेव्हा साताºयात येऊन शिवेंद्रसिंहराजेंसोबत मिसळ खाल्ली त्याच्या काही दिवसांनंतरच पाटण तालुक्यात उदयनराजेंसोबत रमेश पाटील यांनी उघड्या जीपमधून रॅली काढली. 

माण तालुक्यातील गोरे बंधूंची भाऊबंदकीही सर्वांनाच सर्वश्रूत आहे. आमदार जयकुमार गोरे व त्यांचे बंधू शेखर गोरे यांच्यात छत्तीसचा आकडा आहे. माण-खटाव विधानसभा मतदार संघात हे बंधू एकमेकांचे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. एकमेकांच्या विरोधात लढणे, हा एकमेव कार्यक्रम घेऊन त्यांच्या राजकीय हालचाली सुरू असतात. मागील विधानसभा निवडणुकीत आमदार जयकुमार गोरे हे काँगे्रसचे उमेदवार असताना त्यांच्या विरोधात रासपमधून शेखर गोरे लढाईला उतरले होते. माण तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांच्या निवडणुकीत या दोन बंधूंमध्ये कायमच खणाखणी सुरू असते. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र दोन्ही भावांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे काम करण्याचे जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली. दोघांनीही राष्ट्रवादीला विरोध करत स्वतंत्रपणे आपली यंत्रणा माढा लोकसभा मतदार संघात कामाला लावली आहे. भाजपचा प्रचार करत असताना एकाच व्यासपीठावर येणे मात्र टाळले आहे. माढा लोकसभा मतदार संघातील एकाच उमेदवाराचा दोघेही प्रचार करत असले तरी एकमेकांतील वैरत्व त्यांनी कायम ठेवले आहे.  हा निव्वळ योगायोग...माढा लोकसभा मतदार संघातील उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना गोरे बंधूंनी दिलेल्या पाठिंब्याविषयी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र हा निव्वळ योगायोग असल्याचे स्पष्टीकरण शेखर गोरे यांनी केले. मात्र, आ. जयकुमार गोरे यांना कायम विरोध राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ज्या व्यासपीठावर जयकुमार असतील त्या व्यासपीठावर जाणार नाही, स्वतंत्र यंत्रणेच्या माध्यमातून लोकसभेचा प्रचार करणार असल्याचेही शेखर गोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यावर अन्याय केल्याने त्यांच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही. त्याचवेळी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीला मान देऊन भाजप व शिवसेनेचे माढा लोकसभा मतदार संघातील उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. दुष्काळी भागाला निधी मिळणे, हे माझे प्रथम प्राधान्य आहे. - शेखर गोरे

टॅग्स :satara-pcसाताराUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले