शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

'जवानांचा अपमान करणारा 'तो' आमदार मोदींच्या व्यासपीठावर कसा?'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 8:40 PM

प्रशांत परिचारक आजच्या नरेंद्र मोदींच्या अकलूजच्या सभेत उभा असतो ही जवानांबद्दलची भाजपाला आस्था आहे.

सातारा - भारतीय जनता पार्टीचा पक्षाचा आमदार प्रशांत परिचारक जवानांच्या कुटुंबीयांबद्दल अपशब्द वापरतो, तरी भाजप कारवाई करत नाही, तो आमदार राहतो आणि हाच परिचारक आजच्या नरेंद्र मोदींच्या अकलूजच्या सभेत उभा असतो ही जवानांबद्दलची भाजपाला आस्था आहे अशी जोरदार टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सातारा येथील जाहीर सभेत केली. 

आमदार प्रशांत परिचारक यांच्या सैनिकांबद्दलच्या भाषणाचा व्हिडीओ दाखवत राज ठाकरे यांनी भाजपाचा समाचार घेतला. त्याचसोबत अकलूजमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषणावेळी हाच परिचारक मोदींच्या व्यासपीठावर होता याचा फोटो राज ठाकरेंनी व्यासपीठावर दाखवला. 

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आपले सैनिक काश्मीरमध्ये चेकपोस्टवरती प्रामाणिकपणे त्यांचं कर्तव्य बजावत असताना, कोणीतरी ३,३ चेकपोस्ट तोडून घुसणाऱ्याला नाईलाजाने गोळी मारली. पुढे काश्मीर पेटलं आणि अशा वेळेला सैन्याच्या नावावर राजकरण करणाऱ्या मोदींनी सैनिकांना माफी मागायला लावली आणि त्यांच्यावर केसेस टाकल्यात असं राज यांनी सांगितले. 

मोदी सत्तेत आल्यावर जेवढे सैनिक शहीद झालेत तेवढे ह्याच्या आधी कधी झाले नव्हते. पाकिस्तानला जशास तसं उत्तर देऊ असं सत्तेत येणाच्या आधी म्हणणारे मोदी, स्वतःच्या शपथविधीला नवाब शरीफना बोलवतात, त्यांना केक भरवतात. त्यावर शहीद जवानांच्या कुटुंबियांना काय वाटलं असेल? असा सवाल राज यांनी केला. 

आज सैन्यातील जवान अत्यंत कठीण परिस्थितीत देशांच्या सीमांचं रक्षण करत असतात, आणि आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शहीद जवनांचा वापर राजकीय फायद्यासाठी करून घेतात. १५ एप्रिलला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदी म्हणाले की शेतकरी आत्महत्या हा जर निवडणुकांचा मुद्दा होऊ शकतो तर शहीद जवान का होऊ शकत नाही? तुमच्या हातात सगळी सत्ता आहे मग तरीही सीमांच्या आडून शस्त्र, अतिरेकी येतात कुठून आणि कसं? शहीद जवानांच्या नावावर मतं मागताना पंतप्रधानांना लाज वाटत नाही का? असा घणाघात राज ठाकरे यांनी साताऱ्याच्या जाहीर सभेत केला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपाPrashant Paricharakप्रशांत परिचारक