शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

लूटमार करणाऱ्या टोळीचा म्होरक्या अखेर गजाआड

By admin | Updated: November 1, 2015 23:46 IST

महामार्गावरील घटना : चौघांना महिन्यापूर्वीच झाली होती अटक

सातारा : महामार्गावर ट्रकचालकांना मारहाण करून लूटमार करणाऱ्या टोळीच्या सूत्रधारास बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा त्याला ताब्यात घेण्यात आल्याने लूटमारीच्या अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गणेश चंद्रकांत चव्हाण (वय २२, रा. मेघदूत कॉलनी, देगाव फाटा, सातारा) असे या म्होरक्याचे नाव आहे. सुमारे महिनाभर पोलिसांशी लपंडाव खेळल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा तो पोलिसांच्या हाती सापडला. सामान्यत: राज्याबाहेरील ट्रक अडवून चालक-क्लीनरला मारहाण करणे आणि त्यांच्याकडील रोकड आणि ऐवज घेऊन पोबारा करणे, ही या टोळक्याची कार्यपद्धती होती. यासंदर्भात दि. १ आॅक्टोबर रोजी चार जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. तमिळनाडूतील ट्रक (टीएन २८ एम १४९४) घेऊन जात असलेल्या वरदराज वरदराजन (वय ४५, रा. ओरेट्टीपट्टी, तमिळनाडू) या चालकाला ट्रकच्या केबीनमधून बाहेर ओढून त्याच्याजवळील एक हजारांची रक्कम आणि मोबाइल या टोळक्याने काढून घेतली होती. गस्तीवरील पोलिसांना माहिती मिळताच वेगाने चक्रे फिरली आणि आपल्या दोन मोटारसायकली घटनास्थळीच सोडून संशयितांना पळ काढावा लागला होता. त्याच रात्री जगन्नाथ बबन झोरे (वय २०, रा. निवकणे, ता. पाटण), संतोष तुळजाराम खोत (वय २३, रा संख, ता. जत, जि. सांगली), अमित शंकर शिंदे (वय २५, रा. मायणी, ता. खटाव) आणि अजित गोरखनाथ धनवडे (वय २१, रा. शिवाजीनगर, शेंद्रे) या चौघांना अटक करण्यात आली होती. गणेश चव्हाण या टोळीचा म्होरक्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते; मात्र या घटनेनंतर तो पसार झाला होता. त्याला अटक झाल्याने अनेक गुन्ह्यांची माहिती मिळणे शक्य होईल, असा पोलिसांचा कयास आहे. (प्रतिनिधी) गस्ती पथकामुळे पर्दाफाश... एक आॅक्टोबरच्या रात्री अतिरिक्त पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, उपनिरीक्षक हेमराज साठे यांच्यासह गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी एकत्रित प्रयत्न केल्याने चारजण हाती लागले होते. त्यावेळी रजेवर असतानाही गुन्ह्याची माहिती मिळताच ड्यूटीवर हजर झालेले वाहतूक शाखेचे कर्मचारी विनायक मनवी यांनी चौघांपैकी तिघांना पकडून दिले होते. सोमवारपर्यंत पोलीस कोठडी शुक्रवारी रात्री उशिरा अटक केल्यानंतर गणेश चव्हाणला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत (दि. २) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.