Video: प्रतापगडाच्या पायथ्याशी भूस्खलन, इतिहासप्रेमींनी व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 16:47 IST2020-07-11T16:43:20+5:302020-07-11T16:47:04+5:30
छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानच्या ऐतिहासिक भेटीची साक्ष देणारा हा किल्ला असून जगभरातून या किल्ल्याला पाहण्यासाठी पर्यटन येत असतात

Video: प्रतापगडाच्या पायथ्याशी भूस्खलन, इतिहासप्रेमींनी व्यक्त केली चिंता
सातारा - छपत्रती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पराग्रमाची गाथा सांगणारा गड म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या प्रतापगडाच्या पायथ्याशी भूस्खलन झाल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊन काळात गड-किल्ले आणि पर्यटन स्थळ बंद असल्याने सध्या सर्वच गड किल्ल्यांकडे कुणीही फिरकत नाहीत. त्यातच, पावसाळ्याचेही दिवस सुरु झाल्याने या गड-किल्ल्यांवर पडझडीच्या घटना घडत आहेत. नुकतेच, प्रतापगडाच्या पायथ्याशी भूस्खलन झाल्याचे सांगण्यात येत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानच्या ऐतिहासिक भेटीची साक्ष देणारा हा किल्ला असून जगभरातून या किल्ल्याला पाहण्यासाठी पर्यटन येत असतात. राज्यातील शिवप्रेमी आवर्जून सातारा-महाबळेश्वरच्या पर्यटनात प्रतापगडावर जातात. मात्र, सध्या लॉकडाऊनमुळे या किल्ल्यावर कुणीही नाही, त्यामुळे या किल्ल्यातील काही भागांची होत असलेली पडझडही कुणाच्या नजरेत पडत नाही. मात्र, काही इतिहास प्रेमींच्या लक्षात आल्यानंतर, प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेले भुस्खलन ही चिंतेची बाब असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. प्रतापगड परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरु असून मुख्य बुरुजाच्या खालच्या बाजूस जमीन ढासळल्याचे दिसून येत आहे. काही इतिहासप्रेमींनी याचा व्हिडिओही काढला आहे. त्यामुळे, सरकारने आणि संबंधित विभागाने या किल्ल्याकडे लक्ष देऊन काळजी घेणे गरजेचं असल्याची मागणी, इतिहासप्रेंमींनी केली आहे.