शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलच्या जमान्यातही लँडलाइन,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मोबाइलमुळे अवघं जग आपल्या मुठीत आलं. संवाद अधिक जलद गतीने होऊ लागला. आज घरात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : मोबाइलमुळे अवघं जग आपल्या मुठीत आलं. संवाद अधिक जलद गतीने होऊ लागला. आज घरात जितके सदस्य तितकेच मोबाइल आपल्याला पाहायला मिळतात. या बदलात लँडलाइन व कॉइन बॉक्सची ट्रिंगट्रिंग मात्र अजूनही सुरू आहे. या उपकरणांचा वापर भलेही कमी झाला असला तरी मोबाइल क्रांतीत ते आपले अस्तित्व टिकवून आहेत.

दहा-पंधरा वर्षांपूर्वी मोबाइल केवळ बड्या लोकांच्या हातातच पाहायला मिळत होता. तेव्हा मोबाइलच्या किमती अधिक होत्या शिवाय तो वापरणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. त्यामुळे सर्वसामान्यांपासून ते मोठमोठ्या कंपन्यांमध्ये लँडलाइन फोन वापरले जायचे. याची संख्या लाखांमध्ये होती. यानंतर ‘एका रुपयात भारतात कुठेही बोला’ ही नवी संकल्पना घेऊन कॉइन बॉक्सचे आगमन झाले अन् सर्वसामान्यांना आप्तस्वकीयांशी संवाद करणं सोपं झालं.

अगदी खेड्यापासून ते मोठ्या शहरांपर्यंत या कॉइन बॉक्सने मानाचे स्थान मिळविले. मात्र, मोबाइल क्रांती झाली अन् लँडलाइन, कॉइन बॉक्स घर व दुकानांमधून हद्दपार झाला. सद्य:स्थितीत जिल्ह्यात २७ हजार लँडलाइन फोन तर केवळ ४५० कॉइन बॉक्स शिल्लक आहेत.

(चौकट)

तब्बल २७ हजार लँडलाइन

मोबाइल क्रांतीतही लँडलाइन फोन आपले अस्तित्व आजही टिकवून आहे. शासकीय कार्यालय, रुग्णालय, खासगी कंपन्या, औद्योगिक वसाहती व घरांमध्ये सध्याच्या घडीला तब्बल २७ हजार लँडलाइन असल्याची नोंद दूरध्वनी विभागाच्या दप्तरी आहे.

(चौकट)

जिल्ह्यात ४५० कॉइन बॉक्स

जिल्ह्यात एक काळ असा होता की, टपरीच नव्हे, तर मोठ्या दुकानांच्या बाहेरही कॉइन बॉक्स नजरेस पडत होता. एकेका दुकानात तर तीन-चार कॉइन बॉक्स होते. मोबाइल क्रांतीमुळे कॉइन बॉक्सचा वापर कमी होत गेला. आता जिल्ह्यात केवळ ४५० कॉइन बॉक्स उरले असून, तेही नावापुरतेच उरले आहेत.

(चौकट)

कॉइन बॉक्स वापरणारे कोण?

जिल्ह्यातील वसतिगृह, ठराविक पानटपऱ्या व काही रुग्णालयांच्या आवारातच असे कॉइन बॉक्स आपल्याला पाहायला मिळतात; परंतुु याचीही संख्या बोटावर मोजण्याइतकी आहेत. मोबाइल कंपन्यांनी ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार नाही, अशा योजना सुरू केल्याने कॉइन बॉक्सवर वेळ व पैसा घालविणे अनेकांनी बंद केले आहे.

(कोट)

म्हणून लँडलाइन आवश्यकच

रुग्णालय, शाळा व खासगी कंपन्यांमध्ये लँडलाइन अधिक गरजेचा आहे. ही सेवा अत्यंत कमी वेळा खंडित होते. त्यामुळे मोबाइल बंद झाला तरी लँडलाइनवर वेळेत व कोठेही संवाद साधता येतो.

- विजया बावळेकर, महाबळेश्वर

(कोट)

बहुतांश घरांमध्ये आजही लँडलाइन फोन वापरले जातात. वयोवृद्ध व्यक्ती किंवा ज्यांना मोबाइल हाताळता येत नाही अशांना लँडलाइन वापरणे अधिक सोयीचे ठरते. अनेकांना लँडलाइनच बरा वाटतो.

- विक्रांत पवार, सातारा