शहरं
Join us  
Trending Stories
1
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
2
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
3
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
4
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
5
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
6
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
7
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
8
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
9
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
10
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
11
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
12
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
13
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
14
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
15
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
16
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
17
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
18
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
19
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
20
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
Daily Top 2Weekly Top 5

रामाच्या भूमीत धरणग्रस्तांना वनवास

By admin | Updated: December 2, 2014 21:28 IST

‘उत्तरमांड’ची चौदा वर्षे : मागण्या मान्य न झाल्यास ‘जेलभरो’चा कृती समितीचा इशारा

चाफळ : विभागातील गमेवाडी (ता.पाटण) येथील उत्तरमांड धरणाला एक महिन्यानंतर १४ वर्षे पूर्ण होत आहेत. रामायणातील प्रभु श्रीरामालाही १४ वर्षांचा वनवास भोगल्यानंतर न्याय मिळून स्वत:चे राज्य परत मिळाले होते. त्याच प्रभूरामाच्या या पवित्र भूमीत आज चौदा वर्षांनंतर या धरणाने बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळू शकला नाही. येत्या १५ दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास जेलभरो अंदोलन करणार असल्याचा इशारा उत्तरमांड धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ एकावडे यांनी दिला आहे.
यासंदर्भातील निवेदनात म्हटले आहे की, १९९९ मध्ये सुरु झालेल्या उत्तरमांड धरणाचे काम आजमितीस पूर्ण झाले आहे. ज्या धरणग्रस्तांनी शासनावर विश्वास ठेवून घरादाराचा त्याग करुन जमिनी देऊ केल्या त्या धरणग्रस्तांना १९९९ ते २०१४ या १४ वर्षांच्या कालावधीत न्याय मिळाला नाही. आपल्या न्याय्य हक्कासाठी त्यांना आजही शासनदराारी झगडावे लागत आहे. वारंवार अर्ज, विनवण्या, आंदालने करुन शासनाचे उंबरठे झिजवूनही धरणग्रस्तांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास कोणाला सवड नाही. १४ वर्षे घरदार व जमिनीपासून वंचित असलेले धरणग्रस्त हालअपेष्टा सोसत मोठ्या उमेदीने न्यायासाठी झुंज देत आहेत. आजही धरणग्रस्तांचे १०० टक्के पुनवर्सन झाले नाही. धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला असताना बाधित शेतकऱ्यांच्या जमिनींना पाणी मिळू शकले नाही. अजूनही ३५ टक्के पुर्नवसन बाकी आहे. ज्या शेतकऱ्यांना जमिनींचे वाटप करण्यात आले आहे, त्यांना जमीन कसण्यास मूळ मालकाकडुन अडथळा केला जात आहे. ज्यांना घरासाठी जागा मिळाल्या आहेत तिथे कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही. गावठाणातील आठरा नागरी सुविधा सुस्थितीत नाहीत. बाधित घरांचे पैसे मिळाले नाहीत. या मागण्यांबाबत धरणग्रस्तांवर अनेकदा पोकळ अश्वासनांची खैरात करण्यात आली; मात्र काहीच घडले नाही.
राज्यात व देशात नवीन सरकार आले आहे. या सरकारने व नवीन मंत्र्यांनी संपूर्ण संसाराची आहुती देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांची परवड थाांवावी. कारण याच प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून आज चाफळपासून उंब्रजपर्यंत हरितक्रांती घडली आहे. चौदा वर्षांचा वनवास भोगणाऱ्या या प्रकल्पग्रस्तांना आता तरी न्याय मिळणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. ‘आम्हाला नवीन सरकारकडून खूप अपेक्षा आहेत. याबाबत पंधरा दिवसांत योग्य निर्णय घ्यावा; अन्यथा धरणातून पाण्याचा एक थेंबही सोडू दिला जाणार नाही. हक्कांसाठी धरणग्रस्त जेलभरो आंदोलन करतील,’ असा इशारा कृती समितीने दिला आहे. (वार्ताहर)