खामगाव येथे नऊ लाखांचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:26 IST2021-06-19T04:26:11+5:302021-06-19T04:26:11+5:30

फलटण : फलटण तालुक्यातील पाच सर्कल खामगाव येथील बंद घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सोन्याचे दागिने व रोख ...

Lampas worth Rs 9 lakh at Khamgaon | खामगाव येथे नऊ लाखांचा मुद्देमाल लंपास

खामगाव येथे नऊ लाखांचा मुद्देमाल लंपास

फलटण : फलटण तालुक्यातील पाच सर्कल खामगाव येथील बंद घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा नऊ लाख ३० हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

याबाबत शोभा माणिक पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खामगाव येथील त्यांची मुलगी अश्विनी शिंदे हिच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा चोरट्याने बुधवारी (दि. १६) तोडून रात्री नऊ ते गुरुवारी (दि. १७) पहाटे साडेपाच या वेळेत घरात प्रवेश करून घरातील लोखंडी राजाराणी कपाटातील नऊ लाख पाच हजार ३१० रुपये किमतीचे दागिने, कपाटाशेजारील लोखंडी कपाटातील २५ हजार रुपये असा एकूण नऊ लाख तीन हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख तपास करीत आहेत.

Web Title: Lampas worth Rs 9 lakh at Khamgaon