शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

तामिळनाडूतही राबविणार ‘कृष्णा पॅटर्न’ : सत्तर शेतकऱ्यांची कारखान्यास भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:30 AM

तामिळनाडू राज्यातील शासकीय अधिकारी, साखर कारखान्याचे शेती अधिकारी यांच्यासह सत्तर शेतकºयांनी नुकतीच अभ्यास दौºयानिमित्त कारखान्यास भेट दिली.

ठळक मुद्देविविध उपक्रमांसह योजनांचीही घेतली माहिती

कºहाड : तामिळनाडू राज्यातील शासकीय अधिकारी, साखर कारखान्याचे शेती अधिकारी यांच्यासह सत्तर शेतकºयांनी नुकतीच अभ्यास दौºयानिमित्त कारखान्यास भेट दिली.

कारखान्याचे कामकाज व कारखाना राबवित असलेल्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांची पाहणी या शिष्टमंडळाने केली असल्याची माहिती कारखाना प्रशासनाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.

कारखाना प्रशासनाने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ सातत्याने शेतकरी सभासदांच्या हितासाठी नवनवीन उपक्रम राबवित असते. यामध्ये सभासद शेतकºयांचे उत्पादन वाढीसाठी जयवंत आदर्श कृषी योजना, शेतकरी संवाद मेळावे, अल्पदरात द्रवरूप जीवाणू खते, सेंद्रिय खते, माती परीक्षण, मोफत साखर, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने ऊसनोंदी, पारदर्शक तोडणी यंत्रणा यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे.

देशातील सहकारी साखर कारखानदारीला दिशादर्शक असणाºया यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची महती सर्वदूर पोेहोचली आहे. या कामकाजाची माहिती जाणून घेण्यासाठी तामिळनाडू राज्यातील शासकीय अधिकारी, सहकारी साखर कारखान्याचे शेती अधिकारी व तामिळनाडू राज्यातील विविध जिल्ह्यांतून सत्तर शेतकºयांच्या शिष्टमंडळाने कारखान्यास भेट दिली.या अभ्यास दौºयाचे आयोजन तामिळनाडू शासनाचे कृषी खाते व भारतीय शुगर यांच्या वतीने आत्मा योजनेंर्तगत करण्यात आले होते. यावेळी भारतीय शुगर्सचे प्रेसिडेंंट विक्रमसिंह शिंदे, भारतीय शुगर्सचे उपाध्यक्ष सी. एन. देशपांडे, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, भारतीय शुगर्सचे जनरल मॅनेजर संग्रामसिंह शिंदे, डॉ. भास्करराव जाधव, पंकज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.कारखाना राबवित असलेल्या योजनांची माहिती कारखान्याचे ऊसविकास अधिकारी पंकज पाटील यांनी दिली. प्रश्नांची समर्पक उत्तरे सहायक ऊसविकास अधिकारी शिवाजी बाबर व डॉ. विजयकुमार कुंभार यांनी दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखाने