शहरं
Join us  
Trending Stories
1
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
2
CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट
3
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
4
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
5
Latest Marathi News LIVE Updates: "धारावीकरांना हुसकावून लावण्यासाठी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त...", काँग्रेस खासदारांचा गंभीर आरोप
6
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
7
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
8
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
9
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
10
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
11
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
12
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
13
Vastu Shastra: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग एकदा भिंतीवरची चित्र बदलून पाहाच!
14
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
15
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
16
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
17
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
18
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
20
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
Daily Top 2Weekly Top 5

बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:41 IST

सातारा : जावळी तालुक्यातील कसबे-बामणोली आणि परिसरातील दुर्गम, डोंगराळ भागातील कोरोनाबाधित रुग्णांना बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्रातच उपचाराची सुविधा उपलब्ध ...

सातारा : जावळी तालुक्यातील कसबे-बामणोली आणि परिसरातील दुर्गम, डोंगराळ भागातील कोरोनाबाधित रुग्णांना बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्रातच उपचाराची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदार फंडातून निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या सूचनेनुसार आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली असून, बामणोली येथे कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी ४ लाख ८२ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये बामणोली आरोग्य केंद्रामध्ये कोविड केअर सेंटर उभारणीस प्रारंभ होणार आहे.

कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, सर्वत्र हाहाकार उडाला आहे. सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांना उपचारासाठी बेड मिळणे अवघड झाले असून, उपचाराविना रुग्ण दगावत आहेत. कसबे बामणोली हा जावळी तालुक्यातील अतिदुर्गम आणि डोंगराळ भाग आहे. बामणोली परिसरातील अनेक गावे दुर्गम असल्याने या भागातील कोरोनाबाधित रुग्णांंच्या सोयीसाठी बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येच उपचाराची सोय व्हावी, यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे आग्रही होते. शासनाकडे निधी नसेल तर यासाठी लागणारा निधी आमदार फंडातून उपलब्ध करून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी ३० एप्रिल २०२१ रोजी जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना लेखी पत्र पाठवून बामणोली आरोग्य केंद्रामध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करून त्वरित जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडे पाठवण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच त्यांनी जिल्हा नियोजन अधिकारी यांनाही बामणोली येथे कोविड केअर सेंटर सुरू करावे आणि त्यासाठी आमदार फंडातून निधी घ्यावा, अशी सूचना केली होती.

(चौकट)

बामणोलीला रुग्णवाहिका; सोमर्डीला वैद्यकीय पथक द्या

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच कोरोना आढावा बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते. या बैठकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका नसल्याने मोठी गैरसोय होत असल्याचे सांगून बामणोलीसाठी कायमस्वरूपी रुग्णवाहिका देण्याची मागणी केली. तसेच सोमर्डी येथे रुग्ण तपासणी आणि लसीकरण करण्यासाठी पूर्णवेळ वैद्यकीय पथक नेमा, अशी मागणीही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. पालकमंत्र्यांनी या दोन्ही मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.