शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

गुंठेवारीच्या निर्णयावर कोरेगावकर आक्रमक

By admin | Updated: February 9, 2015 00:46 IST

आंदोलनाचा दिला इशारा : प्रांताधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती

कोरेगाव : प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी कोरेगाव शहरातील गुंठेवारीबाबत एकतर्फी निर्णय घेत दस्त प्रमाणित न करण्याविषयी दुय्यम निबंधकांना पत्र वजा आदेश दिल्याने कोरेगावकर आक्रमक झाले आहेत. याबाबत त्यांनी शनिवारी प्रांताधिकारी यांना निवेदन सादर करत त्यांच्यावर प्रश्नांची सरबती केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्याबाबत त्यांनी सूचित केले. दरम्यान, याबाबत सकारात्मक विचार नाही झाला तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल बर्गे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप बर्गे, सातारा लोकसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अ‍ॅड. श्रीकांत चव्हाण, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज बर्गे, लक्ष्मीचंद शहा, नगरविकास कृती समितीचे राजेश बर्गे, किशोर बर्गे, आबासाहेब जाधव, अण्णा बर्गे, राजेंद्र सावंत, बाळकिसन भोसले, उमेश जगताप, बच्चूशेठ ओसवाल, हरिभाऊ कोळी, उमेश भावी, अरुण दुबळे, आदींच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी यांची भेट घेतली व निवेदन सादर केले. यावेळी झालेल्या चर्चेत कोरेगाव शहरासह रहिमतपूर आणि पाडळी स्टेशन (सातारारोड) येथे जमीन एकत्रिकीकरण योजना झालेली नसल्याने तुकडेबंदी लागू केलेली नाही, त्यामुळे गुंठेवारीचे दस्त करण्यास कोणतीही अडचण नसताना प्रांताधिकारी यांनी दिलेल्या एकतर्फी आदेशावर कोरेगावकर नागरिकांनी आक्षेप नोंदविला. ग्रीन झोनमुळे जमिनी बिनशेती होत नाहीत. शहर विकास आराखडा कालबाह्य झाला असून, त्याची देखील मुदत संपलेली आहे. शहरीकरण वाढत असताना प्रशासनाने अशी चुकीची भूमिका का घेतली, असा सवाल यावेळी करण्यात आला. गावठाणाचे क्षेत्र कमी असल्याने नागरिकांनी काय करायचे, आदी प्रश्न प्रांतांना करण्यात आले. या प्रश्नाच्या अनुषंगाने पालकमंत्री विजय शिवतारे यांना निवेदन दिले असून, जिल्हाधिकाऱ्यांनी आठ दिवसांचा अवधी मागितलेला असून, त्याची मुदत संपून गेली आहे. प्रशासन चुकीचे निर्णय घेत असल्याने आम्ही वेळप्रसंगी आंदोलन छेडू, असा इशारा देण्यात आला. (प्रतिनिधी)राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी शासन असताना दस्त होत होते. त्यावेळी कोणाचीही कसलीही तक्रार नव्हती. अधिकारी देखील तेव्हा कायद्याचे पालन करत होते. आता राज्यात शासन बदलल्याने अधिकारी देखील बदलले आहेत. कोरेगावातील गुंठेवारी बंद करण्याचे पाप भाजप व शिवसेना युती शासनाचे आहे, असा आरोप अ‍ॅड. श्रीकांत चव्हाण यांनी केला.