शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

मानपूरनगरीचा राजा देवराजचे ‘देवापूर’

By admin | Updated: April 1, 2015 00:06 IST

उज्ज्वल ऐतिहासिक वारसा : चालुक्य, शीलाहार, देवगिरीच्या यादवांनी माणदेशावर केले राज्य --नावामागची कहाणी-तेवीस

सचिन मंगरूळे - म्हसवड  दक्षिण हिंदुस्थानात प्राचीन काळी राष्ट्रकुटाची घराणी अनेक ठिकाणी राज्य करीत होती. त्यापैकी या घराण्यातील राजा मानाड्.क याने कुंतल देशात राज्य स्थापन केले. त्याची राजधानी होती ‘मानपूरनगरी’. सध्या राजेवाडी तलावाच्या पाणलोटात ही नगरी स्थिरावली आहे. मानाड्.क राजाचा पुत्र देवराज राज्य करीत होता. याच राजाच्या नावावरून ‘देवापूर’ असे नाव मिळाले, असे ऐतिहासिक संदर्भ देऊन ‘देवापूर’च्या नावामागची कहाणी सांगितली जाते. राष्ट्रकुट राज्याचा संस्थापक मानाड्.क हा प्रसिद्ध राजा प्रसिद्ध होऊन गेला. त्याचे राज्य कुंतल देशात पसरले होते. (सध्याचे सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर हे जिल्हे). त्याची राजधानी मानपूर ही म्हसवडच्या आग्नेयेस पाच ते सहा किलोमीटर अंतरावर होती. बावीस बिघ्यांची व बावीस पुरुष उंच बळकट गढी होती. आतमध्ये मोठे वाडे होते. गढीभोवती खंदक होता. त्यातून माण नदीचे पाणी खेळविले होते. हत्ती, उंट, घोड्यांचा येथे बाजार भरत असे. ही गढी ११८७२ ते १८७८ मध्ये इंग्रज राजवटीत राणी व्हिक्टोरियाने बांधलेल्या स्थिरावली. कंधार (जि. नांदेड) येथील राष्ट्रकुटाची गढी २५ एकराची आहे. ही मानपूरच्या गढीची जुळी बहीण होती. मानपूरपासून दोन मैलावर महादेवाचे मंदिर होते. ते आजही अस्तित्वात आहे. मात्र, देवापूर हे गाव राजेवाडी तलावाच्या पश्चिमेस वसले आहे. गावची लोकसंख्या तीन हजार आहे.मानाड्.क राजाने इ. स. ३७५ च्या दरम्यान राज्य केले. कुंतल देशाची राजधानी मानपूरनगरी येथे होती. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात देवापूर गावाजवळ सध्याच्या राजेवाडी तलावात हे गाव बुडाले. देवराज राजानंतर त्यांचा पनतू अभिमन्यू, पुढे राजा गोविंद यांचे माणदेशावर राज्य होते. देवापूरनगरीच्या जवळ पश्चिमेस महादेव मंदिर असून मंदिरात भव्य असा देखणा नंदी आहे. मंदिराशेजारी मोठी बारव असून शेषयानी भगवान विष्णू, लक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत. त्यावर अप्सरा आहेत. त्यास ‘नांगरतास’ असे संबोधले जाते. मानपूरनगरीचे अवषेश आजही अस्तित्वातमाण तालुक्यातील देवापूरजवळ मानपूरनगरीचे भग्नावषेश आजही पाहायला मिळतात. औरंगजेबाचा खवासपूर येथे तळ असताना मोघलांनी मंदिराची तोडफोड केली. येथून नऊ मैल अंतरावर खवासपूर आहे. माणदेश दंडकारण्याचा भागमाणदेश दंडकारण्याचा भाग होता. रामायण, महाभारतकालीन काही संदर्भ या भागात आढळतात. विक्रमादित्य चंद्रगुप्त मौर्य याने आपला राजकवी कालिदास याला समकालीन राष्ट्रकुट राज्याच्या दरबारी दूत म्हणून पाठविले होते. त्यावेळी मानाड्.क राजाचा पुत्र देवराज राज्य करीत होता.