साताऱ्यातून बारा वर्षांच्या मुलाचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 14:15 IST2021-07-14T14:13:58+5:302021-07-14T14:15:35+5:30
Crimenews Satara : सातारा येथील अर्कशाळा नगर परिसरातून देवराज संजय तोडकर (वय १२, रा. अर्कशाळा नगर, सातारा) याचे अज्ञाताने अपहरण केल्याची घटना दि. १३ रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली.

साताऱ्यातून बारा वर्षांच्या मुलाचे अपहरण
ठळक मुद्देसाताऱ्यातून बारा वर्षांच्या मुलाचे अपहरणशाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
सातारा : येथील अर्कशाळा नगर परिसरातून देवराज संजय तोडकर (वय १२, रा. अर्कशाळा नगर, सातारा) याचे अज्ञाताने अपहरण केल्याची घटना दि. १३ रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली.
याबाबत संजय शिवलिंग आप्पा तोडकर (वय ५४) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा देवराज हा दि. १३ रोजी रात्री अचानक गायब झाला. त्याचा अर्कशाळा नगर परिसरात त्यांनी शोध घेतला असता तो सापडला नाही.
त्यामुळे अज्ञाताने त्याचे अपहरण केल्याची तक्रार त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली. याबाबत अधिक तपास हवालदार माने हे करत आहेत.