टेम्पोच्या धडकेत खेड येथील बापलेकीचा मृत्यू; नागठाणेतील घटना, दुचाकीला पाठीमागून धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 21:31 IST2025-06-08T21:31:09+5:302025-06-08T21:31:21+5:30

भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने शेख यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले.

Khed resident dies in tempo collision; Nagthane incident, bike hit from behind | टेम्पोच्या धडकेत खेड येथील बापलेकीचा मृत्यू; नागठाणेतील घटना, दुचाकीला पाठीमागून धडक

टेम्पोच्या धडकेत खेड येथील बापलेकीचा मृत्यू; नागठाणेतील घटना, दुचाकीला पाठीमागून धडक

लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा: पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर नागठाणे, ता. सातारा येथे भरधाव टेम्पोने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील बापलेकीचा दुर्देवी मृत्यू झाला. हा अपघात रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास झाला. मृत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रहिवासी आहेत.

इब्राहिम हसन शेख (वय ३८), मेहेक इब्राहिम शेख (वय १२ दोघेही रा. जवुळके खुर्द रेटवडी, ता. खेड, जि. पुणे) अशी अपघातात ठार झालेल्या बापलेकीचे नाव आहे. याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, इब्राहिम शेख हे त्यांच्या लहान मुलीसह दुचाकीवरून नागठाणे येथे निघाले होते. यावेळी भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने शेख यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले.

या अपघातानंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान बापलेकीचा मृत्यू झाला. टेम्पो चालक आसीफ नैमुद्दीन सय्यद (वय ३०, रा. सय्यद नगर हडपसर पुणे) याच्यावर बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Khed resident dies in tempo collision; Nagthane incident, bike hit from behind

टॅग्स :Accidentअपघात