शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Pune-Bangalore Highway: खंडाळा परिसर ठरतोय अपघातांचा ‘ब्लॅक स्पॉट’; 'या' थांब्यांवर दुर्घटनेचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 18:09 IST

अपघातांमुळे वाहनचालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे

मोहित देवधरखंडाळा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळा परिसर अपघातांचा ‘ब्लॅक स्पॉट’ ठरत आहे. पुणे बाजूकडे जाताना खंबाटकी बोगदा ते केसुर्डी फाटा, सातारा बाजूकडे जाताना केसुर्डी फाटा ते खंबाटकी घाट या टप्प्यांमध्ये वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे वाहनचालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. इतके अपघात, इतके मृत्यू, नुकसान होऊनही प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे आजही परिस्थिती बदलली नाही. सर्वसामान्य नागरिक व प्रवाशांना मात्र या परिसरातून प्रवास करणे कठीण झाले आहे.या थांब्यांवर दुर्घटनेचे सावटखंडाळ्यात महामार्गावर पुणे स्टॉप, सातारा स्टॉप त्याचप्रमाणे शहरातील छत्रपती शिवाजी चौकातील लोणंद स्टॉप या ठिकाणच्या थांब्यांवर प्रवाशांच्या उभ्या असलेल्या गर्दीमुळे व त्या ठिकाणी प्रवाशांसाठी नसलेल्या सोयीमुळे अपघाताची परिस्थिती अनेकदा निर्माण होत आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी महामार्गावर पुणे स्टॉपवर झालेल्या अपघातामध्ये एकाच वेळी नऊजण मृत्युमुखी पडले होते.

वाचा : राष्ट्रीय महामार्गबाजुच्या थांब्यावर घोंगावतोय मृत्यू, प्रवासी थांबतात रस्त्यावरच 

या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी सर्व थांब्यांची व्यवस्थित निर्मिती होणे अपेक्षित आहे. यामध्ये खंडाळ्यामधील पुणे स्टॉप व सेवारस्त्याची साइड पट्टी यामध्ये तब्बल दोन फूट खोलीचे अंतर आहे. त्यामुळे किरकोळ अपघात अनेकदा या ठिकाणी होत असतात.अपघातांची मुख्य कारणे..

  • बोगद्याबाहेर तीव्र उतार
  • रॅम्बलरमुळे दुचाकी अनियंत्रित होते
  • बेशिस्त अवजड वाहनचालक वाहन न्यूट्रल करतात
  • एस कॉर्नर परिसरात सतत पडणारे खड्डे
  • कालवा परिसरात अपुरा रस्ता
  • रात्री अंधारात रस्त्याचा अंदाज येत नसल्याने
  • बोगद्याबाहेरील परिसरात दरडी कोसळल्याने रस्त्यावर येणाऱ्या छोट्या दगडांमुळे

वाचा : काळजला महामार्गाच्या कडेलाच भरते मंडई

काय करता येईल?

  • नवीन बोगदा व पुलाचे काम लवकर पूर्णत्वास आणणे; पण तोपर्यंत जुन्या मार्गावर होणाऱ्या अपघातांबाबत या उपायोजना करता येऊ शकतात.
  • बोगद्याबाहेरील परिसरात स्पीड गन बसवून बेशिस्त वाहनचालकांवर कठोर दंड करणे
  • धोकादायक रॅम्बलर काढणे
  • रस्त्याच्या कडेला सांडलेली खडी, कच, गवत काढून रस्ता पूर्ण क्षमतेने वापरात यावा.
  • अपघातानंतर वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी शासकीय ॲम्ब्युलन्स व क्रेन उपलब्ध ठेवाव्यात

वाचा : उंब्रजचा भराव पूलच बनलाय बेकायदा ‘प्रवासी थांबा’

नवीन बोगदा पूर्णत्वास येणार कधी?खंबाटकी बोगद्याबाहेर असलेला तीव्र उतार व एस वळणाने आजपर्यंत शेकडो बळी घेतले आहेत. यावर उपाय म्हणून नवीन बोगदा व एस कॉर्नर सरळ करण्यासाठी भल्यामोठ्या पुलाचे काम सुरू आहे. अद्यापही हे काम पूर्णत्वास आलेले नाही. या ठिकाणी अपघात होऊन नागरिकांची आर्थिक, शारीरिक, मानसिक हानी मोठ्या प्रमाणावर होत असतानाही ‘एनएचएआय’ महामार्ग प्रशासन डोळ्यांवर पट्टी बांधून अगदी मदमस्त भूमिकेत असल्याचे चित्र आहे.काम महामार्गाचे अन् डोकेदुखी पोलिसांनाराष्ट्रीय महामार्ग प्रशासन नवीन बोगदा व पुलाचे कित्येक वर्षे सुरू असलेले काम अद्यापपर्यंत पूर्णत्वास नेऊ शकले नाहीत. या ‘ब्लॅक स्पॉट’ पट्ट्यामध्ये शेकडो अपघात महामार्गावर नियमितपणे होत आहेत. अपघातानंतर विस्कळीत होणारी वाहतूक सुरळीत करेपर्यंत खंडाळा, भुईंज पोलिस, महामार्ग पोलिसांना अहोरात्र झटावे लागते. पोलिस प्रशासनाला कित्येकदा रात्री-अपरात्री अपघातामुळे झालेल्या वाहतूक खोळंब्यावेळी तहानभूक विसरून काम करावे लागते. या सर्व घटनांमध्ये प्रशासनाला शिरवळ रेस्क्यू टीम या आपत्कालीन संघटनेचेही मोलाचे सहकार्य लाभते.

भीषण अपघाताबाबत आकडेवारीवर्ष - अपघात - मृत - जखमी

  • २०२२ - २४ - १३ - १७
  • २०२३ - १९ - १८ - १८
  • २०२४ - १३ ०७ - १३
  • २०२५ - २२ - ०४ - २९
English
हिंदी सारांश
Web Title : Khandala: Pune-Bangalore Highway a 'Black Spot' for Accidents; Danger at Stops

Web Summary : Khandala on the Pune-Bangalore highway is an accident black spot. Frequent accidents near Khambatki tunnel and Kesurdi Phata endanger travelers. Lack of facilities at bus stops exacerbates risks. New tunnel work delays continue, burdening police and rescue teams.