शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडला लायन्स क्लबचा पदग्रहण समारंभ उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:26 IST

कऱ्हाड : येथील लायन्स क्लब ऑफ कऱ्हाडचा यावर्षीचा पदग्रहण सोहळा नुकताच कोरोनाचे नियम पाळून उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे ...

कऱ्हाड : येथील लायन्स क्लब ऑफ कऱ्हाडचा यावर्षीचा पदग्रहण सोहळा नुकताच कोरोनाचे नियम पाळून उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दीपक प्रभावळकर उपस्थित होते. यावेळी लायन्स क्लबचे वरिष्ठ पदाधिकारी शिवाजीराव फडतरे, राकेश साळुंखे, जगदीश पुरोहित यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात प्रारंभी क्लबचे माजी प्रांतपाल विजयकुमार राठी यांनी २०२१-२२चे नूतन अध्यक्ष खंडू इंगळे व त्यांचे संचालक सदस्य यांना शपथ दिली. तसेच उपस्थित अन्य पदाधिकाऱ्यांना त्यांची जबाबदारी सांगून कामाचे स्वरूप सांगण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत नूतन अध्यक्ष खंडू इंगळे व संचालक सदस्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रमुख पाहुणे दीपक प्रभावळकर म्हणाले, लायन्स क्लब ही २१०पेक्षा अधिक देशांत कार्यरत असलेली सर्वात मोठी सामाजिक संघटना आहे. कऱ्हाडच्या क्लबला ५४ वर्षांची परंपरा आहे. यावर्षीच्या अध्यक्षपदी एका पत्रकाराची निवड झाली, याचा मला विशेष आनंद आहे. आगामी काळात सामान्य लोकांसाठी असे काम करा की त्याची दखल लायन्सच्या माध्यमातून इतर देशातसुद्धा घेतली गेली पाहिजे. लायन्सने कऱ्हाडला मोठे काम उभारले असून, कोविड काळातदेखील या क्लबचे काम वाखाणण्याजोगे झाले आहे. यावेळी शहर व परिसरात राबवता येतील, असे अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी यावेळी सुचवले व क्लबकडून यावर्षी ते पूर्णही होतील, अशी आशा व्यक्त करत त्यासाठी माझ्याकडून भविष्यात लागेल ते सहकार्य मी देईन, अशी ग्वाहीदेखील यावेळी दिली.

क्लबचे शिवाजीराव फडतरे, राकेश साळुंखे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन राजेश शहा, जितेंद्र ओसवाल यांनी केले तर मिलिंद भंडारे यांनी आभार मानले.

फोटो