शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

कऱ्हाड : ‘कृष्णा’च्या मैदानात मोहिते-भोसलेंचं वाक् युद्ध -घडतंय-बिघडतंय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 11:36 PM

कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी पत्रकार परिषदेत टीका केली.

ठळक मुद्दे‘भोसलें’च्या उत्तराने ‘मोहितें’चे समाधान झाले का?दोघांच्या.... तिसऱ्याचा लाभ पुतण्याची काकांवर टीका

प्रमोद सुकरे ।कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी पत्रकार परिषदेत टीका केली. कारभाराविषयी काही प्रश्न उपस्थित करीत याची उत्तरे वार्षिक सभेत मिळावीत, अशी मागणी केली. त्यानंतर वार्षिक सभेत विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी याच संदर्भाने उत्तरे दिली. मात्र, सभेच्यावेळी गैरहजर असणाºया डॉ. इंद्रजित मोहितेंचे या उत्तरांनी समाधान झाले का? हा विषय चर्चेचा बनलाआहे.

कृष्णाकाठाचं नंदनवन करणारी संस्था म्हणजे ‘कृष्णा’ सहकारी साखर कारखाना होय; पण या कारखान्यात पुढं काय ‘रामायण’ घडलं, हे जास्त सांगायची गरज नाही. यशवंतराव मोहिते व जयवंतराव भोसले या दोन सख्ख्या भावातला संघर्ष साºया महाराष्ट्राला माहीत आहे. या दोन परिवारांतील संघर्ष असाच पुढे कायम राहिला. मध्यंतरी मनोमिलन झालं खरं; पण ते फारकाळ टिकलं नाही.

सध्या डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली कारखान्यात सत्ता आहे. तर माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्यासह काहीजण संचालक मंडळात आहेत. त्यामुळेच सत्तेबाहेर असणाऱ्या डॉ. मोहितेंनी कारखान्याचा कारभार ऊस उत्पादक सभासदांच्या हिताचा नाही, असा आरोप करीत त्याची उत्तरे सभेत द्या, असे आवाहन केले होते.मात्र, काही कारणास्तव त्यांनाही सभेला उपस्थित राहता आले नाही; पण त्यांच्या गैरहजेरीतही उपस्थित प्रश्नांना डॉ. भोलसेंनी उत्तरे दिली. आता प्रश्न एवढाच उरतो की, या उत्तराने डॉ. मोहितेंचे समाधान झाले का?अविनाशदादांची चुप्पी...‘कृष्णे’ची गत निवडणूक तिरंगी झाली होती. त्यात डॉ. सुरेश भोसले यांचे पॅनेल सत्तेत आले. तर विरोधी माजी अध्यक्ष अविनाश मोहितेंसह काही संचालक निवडून आले. डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा पराभव झाला. त्यानंतर डॉ. इंद्रजित मोहिते सातत्याने सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसताहेत. मात्र, कृष्णेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक अविनाश मोहिते यांनी चुप्पी का बाळगली आहे? याबाबत उलट-सुलट चर्चा आहेत. 

उंडाळकर पिता-पुत्रांची हजेरी चर्चेचीयशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी झाली. या सभेला सभासद असणाºया माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर व जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनी हजेरी लावली. रयत कारखान्याचे संस्थापक असणारे विलासकाका व रयतचे अध्यक्ष अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांची भूमिका कृष्णा कारखाना निवडणुकीत नेहमीच महत्त्वाची ठरली आहे. त्यामुळे या सभेला उंडाळकर पिता-पुत्रांची लागलेली हजेरी चर्चेची ठरली आहे.पुतण्याची काकांवर टीका‘कृष्णा’ कारखान्याच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करीत सभासदांच्या घरावर नांगर फिरवून विधानसभेची स्वप्न पाहू नका, असा टोला डॉ. इंद्रजित मोहिते यांनी भोसलेंना लगावला होता. त्यामुळे पुतणे डॉ. अतुल भोसले यांनी कृष्णा बँकेच्या अन् कारखान्याच्या सभेत काकांवर टीका करीत बोलघेवड्या नेत्यांपासून सावध राहण्याचा सल्ला सभासद कार्यकर्त्यांना दिला.मोहितेंचे प्रश्न....१) मयत सभासद वारस नोंदणीत दिरंगाई का?२) कारखाना पुरस्कृत उपसा सिंचन योजना तोट्यात का?३) आधुनिकीकरणाला ३० कोटींचा खर्च; पण गळीत, रिकव्हरी, उत्पन्नात फायदा का दिसेना४) तोडणी व वाहतुकीच्या बाबतीत मागील संचालक मंडळाच्या अपहाराच्या खटल्याची माहिती सभासदांना द्या.५) ८३ व ८८ खाली झालेल्या चौकशांची माहिती सभासदांना द्या.भोसलेंची उत्तरे...१) ४७१ पैकी ३५१ जणांच्या वारस नोंदी पूर्ण झालेल्या आहेत. उरलेल्या नोंदी या संबंधितांच्या अंतर्गत वादामुळे रखडलेल्या आहेत.२) ‘पुरस्कृत उपसा जलसिंचन योजना’ दुखणं झालंय. खरंतर त्या लोकांनीच चालवाव्यात. आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू.३) आधुनिकीकरणामुळे क्षमतेपेक्षा जास्त गाळप केलं जात आहे. दहा हजारांची गाळप क्षमता करण्यासाठी मागणी करणार आहोत.४) तोडणी व वाहतुकीच्या अपहार खटल्याची चौकशी सुरूच आहे; पण तुम्हाला एवढी घाई का लागली आहे?५) ८३ व ८८ खाली कारखान्यावर आतापर्यंत तीनवेळा चौकशा झाल्या आहेत. २०१० ते २०१५ च्या कारभाराचा चौकशी अहवाल तयार आहे. कारखान्यावर तुम्हाला पाहायला मिळेल, मग न्यायालयीन चौकशीची प्रगती तुम्हीच बघा.दोघांच्या.... तिसऱ्याचा लाभ ‘दोघांच्या भांडणात तिसºयाचा लाभ’ ही म्हण प्रचलित आहे; पण दोघांच्या मनोमिलनात तिसºयाचा लाभ कसा होतो. हे कृष्णा काठाने अनुभवले आहे. अविनाश मोहिते यांच्या रुपाने कृष्णा कारखान्याच्या राजकारणात उदयास आलेले नेतृत्व हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSatara areaसातारा परिसर